• कातरवेळ

  कातरवेळ समुद्राचा आसमंत आर्त स्वर

  श्रीकांत कार्लेकर, डायमंड पब्लिकेशन्स

 • बेअर्ड काका

  बेअर्ड काका धमाल प्रसंगांचे टिल्लुचे विश्व

  सुरेश वांदिले, डायमंड पब्लिकेशन्स

 • सत्यसंभ्रम

  सत्यसंभ्रम जुन्या-नव्या जाणिवांच्या वेध कथा

  दत्तात्रय सैतवडेकर, कोमल प्रकाशन

 • महार कोण होते?

  महार कोण होते? उद्गम : संक्रमण : झेप

  संजय सोनवणी, पुष्प प्रकाशन

 • आनंदयात्रा आनंदयात्रा ग.वा.बेहेरे

  तुम्ही जगावेगळे एकदा वागलात अन जगाचे नियम एकदा का तुमच्या हातून मोडले गेले की सदासर्वकाळ तुमचे मूल्यमापन त्याच सुरात होऊ लागते.तुमच्याबद्दल अनेक दंतकथा जन्म पावू लागतात.ज्यांना मोहाची संधीच कधी मिळाली नाही किंवा ज्यांच्यावर कोणी मोहीत होण्याची शक्यताच नाही अशी माणसे स्वतःला चारित्र्यवान समजून दुस-यांचा पंचनामा करीत राहतात.
  करे तेर तो एक विकृत आनंद असतो.थोडा मत्सराचा,थोडा कर्तृत्वशुन्यतेचा!मोहाला काही कोणी निमंत्रण धाडीत नाही.ते टाळता आले तर उत्तमच!परंतु ज्यांच्या आयुष्यात मोहाचे प्रसंगच नाहीत,त्यांना माणसे मोहवश का होतात हे कसे कळणार? आणि प्रत्येक मोहाची किंमत द्यावी लागते हे कळल्यानंतर मोह जेवढे सुख आणतात.तेवढे दुःखही आणतात हे कळले तर जमिनीवरून चालणा-या या माणसांना मनातल्या मनात बरे वाटेल.

 • कुणा एकाची भ्रमण गाथा कुणा एकाची भ्रमण गाथा गो.नि. दांडेकर

  पहाटेस फ़ार लवकर जाग आली.अडीच-तीनचा सुमार असावा.खोलीच पूर्वेकडलं दार रात्री उघड्चं ठेवलं होतं.नजर आकाशाकडे गेली.पाहिलं तर शुक्र बराच वर आला होता.आकाश नितळ होतं.त्या स्वच्छ आकाशातल्या शुक्राच्या निळ्या चांद्ण्यानं फ़ार फ़ार बरं वाटलं. शुक्राची ही शितल निळवंती अशीच सृष्टी झाकून पसरलेली असावी. अन आपणही त्याच्याकडे पाहत असंच निर्बधशुन्य अवस्थेत लोळत असावं-अनंत काळापर्यंत! मागं कसलाही पाश नाही, कुणी उठ म्हणणारं नाही, काम सांगणारं नाही. मुक्ती आणखी कशी असते? अशीच!

 • नामदेव ढसाळ

  नामदेव ढसाळ

  ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे लहाणपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. पुढे मुंबईतील गोलपीठा या रेड लाइट भागात त्यांचं बालपण गेलं.

 • सुरेश भट जीवन परिचय

  सुरेश भट जीवन परिचय

  सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यांना गझल सम्राट असे मानाने संबोधले जाते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांचा खूप नाद होता. 

 
Icon Video

लघु विवरण

http://marathivishva.com आपली बोली, आपला बाणा ( मराठी भाषा, मराठी संस्कृति आणि मराठी अस्मिता हा प्राण आहे ! )
 
Icon Photo

विशेष आकर्षण

वेबविश्व - रसिक( मराठी पुस्तके, मराठी ध्वनिमुद्रिका, मान्यवरांचे काव्य आणि चरित्र ) - कवि आणि लेखक - मनोरंजन - माझा ब्लॉग - साहित्य - निर्द्र्शिका - सप्तरंग...
 
Icon View

उद्देष्य

मराठी साहित्य, मराठी चित्रपट, मराठी संगीत, चित्रपट आणि साहित्यिक गुणवंताची माहिती पुरविणे, नवोदितांचे ब्लॉग; वेबसाईटचे संकलन पुरवीणे इत्यदि...
 
Icon E-Mail

पुस्त

मराठी - विश्व हे एक निशुल्क मुक्तांगन आहे. अवश्य भेट द्या. आपल्या सुचना, साहित्य फ़ेसबुक पेजवर, ई-मेल वर किंवा थेट संकेतस्थळा वर  लोग इन करून पोष्ट करू शकता....