कलाकार

मराठी अभिनेता, अभिनेत्री, संगीत, कला आणि अन्य क्षेत्रातील मंडळींची जीवन मालिका
भाऊराव का-हाडे

भाऊराव का-हाडे

  • जन्म तिथी: २ मे १९८४
  • जन्म स्थान: अहमदनगर
  • शिक्षण: न्यू आर्ट्स अँंड सायंस काँलेज, अहमदनगर

सरत्या आठवड्यात नगर जिल्ह्याच्या कलाप्रांताला सोन्याचे नवे करकरीत पान जोडले गेले. सदा प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करणार्‍या श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी या आजवर दुर्लक्षित गावातील एका शेतकर्‍याच्या पोराने थेट राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या 'रजतकमळा'ला गवसणी घातली. नियती अन् परिस्थितीने घातलेल्या अनेक 'खोड्यां'ना पुरुन उरत भाऊराव नानासाहेब कर्‍हाडे या कालपर्यंत कोणाच्याही गिणतीत नसलेल्या मनस्वी दिग्दर्शकाने 'ख्वाडा' या चित्रपटाच्या माध्यमातून नगरच्या आणि मराठी चित्रपटप्रांताला सुवर्ण झळाळी दिली. चित्रपटाचा स्पेशल ज्युरी अवॉर्ड आणि ध्वनीमुद्रणाचा पुरस्कार या चित्रपटाने पटकावला, नगरच्या कलाप्रांतात हे प्रथमच घडले.
भाऊरावची मजल कोणत्या उंचीची आहे, हे समजून घेण्यासाठी आधी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समजून घेतले पाहिजे. जगाला वेड लावणार्‍या ऑस्करएवढाच किंबहुना भारतीय चित्रपटासाठी त्याहून काकणभर सरस, असा हा पुरस्कार! सत्यजीत रॉय, अदूर गोपालक्रिष्णन, राजा परांजपे या आशयघन चित्रपट घडविणार्‍या बाप माणसांनी या पुरस्कारांना प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे आयुष्यात भरुन पावले, अशीच चित्रपट कलावंतांची भावना असते. अगदी अभिनयाचा बादशहा अमिताभ बच्चन यांचेच उदाहरण घ्यायचे, तर त्यांना या पुरस्कारासाठी थेट १९९१ च्या 'अग्निपथ'पर्यंत थांबावे लागले. तेव्हा कुठे ते अभिनयातील सवरेत्तम 'सुवर्णकमळा'पर्यंत पोहचले. त्यामुळे या पुरस्कारांची तुलना चॅनलनिहाय 'वाटल्या' जाणार्‍या कचकड्या पुरस्कारांशी होऊच शकत नाही. यावरुन भाऊरावने मारलेल्या हनुमानउडीचा अंदाज येतो.
'ख्वाडा' घडविण्याची चित्तरकथा ऐकली तरी एक नवा 'ख्वाडा' घडेल, एवढे भावनिक चढउतार, खस्ता, निंदा, अवहेलना, पराभव भाऊरावच्या आयुष्यात आले. 'लोकमत'च्या मैत्र पुरवणीत पुण्याच्या इंडियन फिल्म इन्स्टिट्यूटचा लेख वाचून आपणही चित्रपट घडवावा, हे स्वप्न उघड्या डोळ्यांनी पहावे, ते पूर्ण करण्यासाठी जमीन-जुमला विकावा, एका स्वप्नाच्या मागे धावताना आयुष्य पणाला लावावे, हे सारेच अतक्र्य! पण ते वास्तवात घडले. 'ख्वाडा'तून एका स्थलांतरित कुटुंबाची चित्रचौकट साकारताना भाऊराव कदाचित जगलेला प्रत्येक क्षण कॅमेराबद्ध करत होता. म्हणूनच 'ख्वाडा' हृदयात खोलवर उतरत असावा. आजवर दोन ठिकाणी नामांकन झालेल्या या चित्रपटाने थेट पुरस्कारालाच गवसणी घातली, हे त्याचेच द्योतक!
चित्रपट हे व्यक्त होण्याचे, विचार प्रकटीकरणाचे सशक्त माध्यम. सर्वांनाच ते वापरता येते असे नाही. नव्या दमाच्या नागनाथ मंजुळेच्या 'फॅण्ड्री'ने तो अनुभव दिला. त्याच पंक्तीत आता भाऊरावचा 'ख्वाडा' जाऊन बसला आहे. अलीकडच्या काळात मराठी चित्रपटाने अक्षरश: कात टाकली आहे. रेगे, कोर्ट, एलिझाबेथ एकादशी, शाळा अशी आशयसंपन्न कथानके मनाचा ठाव घेतात. डोळ्यांना 'सुख'(?) देण्यार्‍या भंपक चित्रचौकटींना नाकारत 'मन' सुन्न करणार्‍या कथानकांचे पडद्यावर उतरणे तसे धाडसच म्हटले पाहिजे. पण नव्या दमाची तरुण मंडळी हे धाडस दाखवत आहे. त्यात 'ख्वाडा'सारखे प्रयोग नक्कीच उठून दिसतात. चित्रपटाच्या भाषेत २०१३ मध्ये चित्रीकरणाच्या फ्लोअरवर गेलेला 'ख्वाडा' २०१५ च्या जानेवारीत पूर्णत्वास आला. आता तो लवकरच राज्यातील पडद्यापर्यंत पोहचेल. त्यानंतरची जबाबदारी मात्र आपली. सभोवताली अनेक भाऊराव संघर्षरत आहेत. त्यांना शोधता आले, मदतीचा हात देता आला तर भाऊरावचा संघर्ष फळास आला असे समजावे! अनंत पाटील एकेकाळी नगर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पिंपळगाव माळवी तलावाने आज तळ गाठला आहे. काळाच्या ओघात जशी गरज संपत गेली, तसा हा तलाव दुर्लक्षित झाला. परिसरातील शेती आणि वन्य प्राण्यांसाठी या तलावाचे पाणी आजही संजीवनी आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने मातीच्या ढिगार्‍याआडून या तलावात फक्त गढूळ पाण्याचे डबके दिसत आहेत.

---- अनंत पाटील ( संपादक, लोकमत अहमदनगर )

संबंधित कलाप

ख्वाडा

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी