LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

कलाकार

मराठी अभिनेता, अभिनेत्री, संगीत, कला आणि अन्य क्षेत्रातील मंडळींची जीवन मालिका
कादंबरी कदम-देसाई

कादंबरी कदम-देसाई

  • जन्म तिथी:
  • जन्म तिथी: 13 October 1988

कादंबरी कदम-देसाई ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने मराठी नाटकांत, हिंदी-मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते.

कादंबरी कदम मुंबईच्या गोरेगाव विद्यामंदिरात शिकत होत्या. वयाच्या तिसर्‍या वर्षी कादंबरीमधील अभिनयाचे गुण दिसून आले. त्या वयात तिने एका बालनाट्यामध्ये चिमणीच्या पिल्लाचे काम केले होते. जरा मोठ्या झाल्यावर त्यांनी विजय तेंडुलकरच्या एका मराठी नाटकात भूमिका केली होती. तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती तीन बहुरानियाँ या झी टीव्हीवरील मालिकेतल्या तिच्या जानकीच्या भूमिकेमुळे.

याशिवाय तिने कभी सौतन कभी सहेली आणि कहता है दिल ह्या मालिकांमधेही कामे केली आहेत. त्यापूर्वी तिने झी मराठीवरील अवघाची संसार या मालिकेतही काम केले होते. मराठीमधील टॅक्स फ्री या कार्यक्रमाच्या ती सूत्रसंचालक आहे.

कारकिर्द

कादंबरी कदम यांचा अभिनय असलेले मराठी चित्रपट

  • आघात (२०१०)
  • तुला शिकवीन चांगलाच धडा (२००९)
  • पटलं तर घ्या
  • मंगलाष्टक वन्स मोअर (२०१३)
  • ही पोरगी कुणाची
  • क्षणभर विश्रांती (२०१०)

मराठी दूरचित्रवाणी मालिका आणि कार्यक्रम

  • अकल्पित
  • इंद्रधनुष्य
  • दीपस्तंभ
  • महाराष्ट्राचा नच बलिये (कार्यक्रम)

हिंदी दूरचित्रवाणी मालिका

  • कभी सौतन कभी सहेली
  • कहता है दिल
  • तुझ विन सख्या रे 
  • संस्कार धरोहर अपनों की
  • महाराष्ट्राचा नाच बलिये ( स्टार प्रवाह)
  • तीन बहुरानिया  (समीरची पत्नी - झी तोव्ही)
  • कहता है दिल  (लघु भूमिका – स्टार प्लस)
  • कभी सौतन कभी सहेली (लघु भूमिका – स्टार प्लस)

रंगभूमी

  • टोम अंड जेरी
  • चिमणा बांधतो बंगला

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी