LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

कलाकार

मराठी अभिनेता, अभिनेत्री, संगीत, कला आणि अन्य क्षेत्रातील मंडळींची जीवन मालिका
तन्वी हेगडे

तन्वी हेगडे

  • जन्म तिथी:
  • जन्म तिथी: 15 November 1991

पंधरा वर्षांपूर्वी स्टार प्लसवर गाजलेली 'सोनपरी' ही हिंदी मालिका तुम्हाला आठवत असेल. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यात सोनपरीच्या भूमिकेत होती. चार वर्षं चाललेल्या या मालिकेत आणखी एक चेहरा होता, जो आजही आपल्याला विविध जाहिरातींमधून दिसतो. हा चेहरा म्हणजे 'फ्रुटी' उर्फ तन्वी हेगडेचा.  'सोनपरी'मधील 'फ्रुटी' हे लहान मुलीचं पात्र त्यावेळी खूप चर्चेत होतं. त्यामुळे तन्वीला लहान वयातच खूप ग्लॅमर आणि प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर 'चॅम्पियन', 'राहुल', 'विरुद्ध', 'वाह! लाइफ हो तो ऐसी' यांसारख्या हिंदी सिनेमात तन्वीनं बालकलाकार म्हणून काम केलं. आजवर अडीचशेहून अधिक जाहिरातींमध्ये तन्वीनं काम केलंय. हिंदी सिने-मालिकातून प्रकाशझोतात आलेल्या तन्वीनं 'सखी माझी' या मराठी सिनेमाच्या माध्यमातून छोट्या तन्वीनं सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आता ती पुन्हा एकदा मराठी सिनेमात दिसणार आहे. क्षितीज झारापकर दिग्दर्शित 'धुरंधर भाटवडेकर' या आगामी मराठी सिनेमातून तन्वी पहिल्यांदाच नायिकेच्या भूमिकेत दिसेल. यात ती मोहन जोशी, डॉ. मोहन आगाशे, किशोरी शहाणे यांसारख्या अनुभवी कलाकारांबरोबर आहे. 

हिंदी चित्रपट :-

  • 2009 - चल चले 

  • 2005 - वाह ! लाईफ हो तो ऐसी!  

  • 2001 - राहुल  

  • 2000 - चाम्पिओन 

  • 2000 - गजगामिनी 

  • 2005 - विरुध्द....फमिली काम फर्स्ट

टीव्ही मालिका (हिंदी):-

  • सोनपरी 

  • कॅप्टन हाउस 

  • यह है मेरे अपने 

  • शक लक बूम बूम 

मराठी चित्रपट :-

  • 2015 - धुरंधर भाटवडेकर

संबंधित कलाप

धुरंधर भाटवडेकर

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी