कलाकार

मराठी अभिनेता, अभिनेत्री, संगीत, कला आणि अन्य क्षेत्रातील मंडळींची जीवन मालिका
 वीणा जामकर

वीणा जामकर

 • जन्म तिथी: 10 July 1984

वीणा जामकर या एक मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केले. २०१३ सालापर्यंत त्यांनी नऊ नाटके, तेरा एकांकिका, दोन दीर्घांकिका आणि दहा चित्रपटांतून अभिनय केला आहे. व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून वीणा जामकर ओळखल्या जातात. त्यांचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे.

'आविष्कार' या नाट्यसंस्थेचे त्यांच्या नाट्य कारकीर्दीत मोठेच स्थान आहे. 'पलतडचो मुनिस' हा वीणा जामकरांची प्रमुख भूमिका असलेला कोकणी चित्रपट बर्लिन चित्रपट महोत्सवात नावाजला गेला. टोरॅन्टो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला समीक्षकांचे पारितोषिक मिळाले.

वीणा जामकर यांची भूमिका असलेले चित्रपट :-

 • गाभ्रीचा पाऊस
 • जन्म
 • पलतडचो मुनिस (कोकणी)
 • लालबाग परळ
 • वळू
 • विहीर
 • मर्मबंध
 • भाकरखडी ७ की.मी.
 • तप्तपदी 
 • तुकाराम
 • कुटुंब

वीणा जामकर यांनी भूमिका केलेली नाटके :-

 • एक रिकामी बाजू
 • खेळ मांडियेला
 • चार दिवस प्रेमाचे
 • जंगल में मंगल
 • दलपतसिंग येता गावा
 • आणि खूप सा-या महाविद्यालयीन एकांकिका

पुरस्कार :-

 • वीणा जामकर यांना २०१० सालचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार मिळाला आहे.

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी