लालबागची राणी

लालबागची राणी

वीणा जामकर ‘लालबागची राणी’

'लालबाग परळ', 'टपाल', 'कुटुंब', 'बायोस्कोप' सारख्या सिनेमातनं संवेदनशील भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री म्हणून वीणा जामकर हिची ओळख आहे. मोजक्याच पण लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारणारी वीणा नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या शोधात असते. आणि आता ती आपल्यासमोर चक्क 'लालबागची राणी' साकारणार आहे. म्हणजे लालबागचा राजा जगप्रसिद्ध आहे पण मग ही 'राणी' कोण असा प्रश्न तुम्हाला पडेल.

'टपाल' या सिनेमातनं दिग्दर्शनाची नव इनिंग सुरु करणारा सिनेमॅटोग्राफर लक्ष्मण उत्तेकर 'लालबागची राणी' हा नवा सिनेमा घेऊन येतोय. या सिनेमाचे दिग्दर्शन तो करतोय तर सिनेमाची निर्मिती आहे बॉनी कपूर आणि सुनिल मनचंदा यांची. वीणासोबत लक्ष्मणचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा सिनेमा, यापुर्वी 'टपाल'मध्ये वीणा आणि नंदू माधव मुख्य भूमिकेत होते.

वीणा या सिनेमात शीर्षक भूमिका साकारतेय हे आता सर्वांनाच माहीत झालंय. पण या सिनेमात ती अत्यंत वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. ज्याची चर्चा वेगवेगळ्या सोशल साईटसवरुन केली जातेय. अर्थातच लालबागच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या सिनेमात वीणाचा फक्त लूकच नाही तर तिचे चालणे बोलणे, सिनेमातला वावर या सगळ्यावर विशेष मेहनत घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. नुकतंच या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले गेले.. वीणा बरोबरच या सिनेमातनं दगडू फेम प्रथमेश परबही एका वेगळ्या भुमिकेत दिसणार आहे.

No video selected.

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी