LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
'मि. & मिसेस सदाचारी'ची शिवरायांना अद्भुत मानवंदना

'मि. & मिसेस सदाचारी'ची शिवरायांना अद्भुत मानवंदना

मराठी माणसाच्या हृदय सिंहासनावर शिवाजी महाराजांचे स्थान अजरामर आहे. महाराजांवरचे हे निस्सीम प्रेम या ना त्या कारणातून व्यक्त करण्याचा प्रयत्न प्रत्येक मराठी माणूस करत असतो. असाच एक हटके प्रयत्न 'मिस्टर & मिसेस सदाचारी' च्या 'मिस्टर सदाचारी' ने केला आहे. मिस्टर सदाचारी म्हणजेच अभिनेता वैभव तत्ववादी सुद्धा शिवरायांचा मोठा भक्त आहे. शिवरायांवरचे आपले निस्सीम प्रेम दाखवण्याची पुरेपूर संधी त्याला त्याच्या आगामी 'मिस्टर & मिसेस सदाचारी' या फिल्ममध्ये मिळाली आहे.

या सिनेमासाठी वैभवने चक्क त्याच्या छातीवर महाराजांच्या प्रतिमेचा टॅटू काढला आहे. या टेटूसाठी त्याने एक खास छाप तयार केला असून, शुटींगच्या वेळी तो छाप त्याच्या छातीवर काढण्यात येतो. या छाप्यातून काढलेला टॅटू किमान चार दिवस तरी वैभवच्या छातीवर राहतो. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा हा टॅटू सचिन गुरव यांनी डिजाईन केला आहे. शुटींगदरम्यान हा टॅटू प्रत्येक वेळी त्याच जागेवर काढता यावा यासाठी मेकअपमन आणि स्वतः वैभव विशेष काळजी घेत असल्याच समजत. या टॅटूमुळे वैभवला 'मॅचो' लूक आला आहे, या लुकमुळे वैभवला त्याच्या पूर्वीच्या चोकलेट हिरो च्या ईमेज मधून बाहेर पडण्याची संधी मिळाली आहे. 'मिस्टर एंड मिसेस सदाचारी' सिनेमामध्ये शिवरायांवर आधारित 'जगदंब'हे गान देखील चित्रित केलं असून, त्या गाण्यात वैभवने अप्रतिम नृत्य केलं आहे. .

शिवरायांचे गौरवगान सादर करणार हे गाणं पंकज पडघम यांनी संगीतबद्ध केले असून या गाण्यासाठी वैभवने जवळपास आठवडाभर तालीम केली होती. विशेष म्हणजे शिवरायांना मानवंदना देण्यासाठी 'मि. & मिसेस सदाचारी' हा सिनेमा १९ फेब्रुवारी रोजी म्हणजेच शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. यात वैभवसोबत प्रार्थना बेहरेही झळकणार आहे. .

- पल्लवी अतुल शिवले

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी