नागराज 'सैराट'मधून प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणार का?

नागराज 'सैराट'मधून प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणार का?

'फॅन्ड्री' सिनेमातून जब्या आणि पिऱ्या घराघरात पोहोचवणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक सिनेमा घेऊन येत आहे. अस्सल गावरान भाषेत 'जाळ आणि धूर संगटच' असं म्हणत नागराज मंजुळेच्या 'सैराट' या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

टीझरमुळे 'सैराट'ची उत्सुका वाढली आहे. मात्र सिनेमा पाहण्यासाठी पुढील वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण १ जानेवारी २०१६ रोजी 'सैराट' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.फॅन्ड्री'प्रमाणे 'सैराट'लाही 'अजय-अतुलच्या संगीताचा 'मिडास टच' लाभला आहे. त्यामुळे 'तुझ्या पिरतीचाहा इंचू मला चावला' या गाण्याप्रमाणेच, अजय- अतुल आता 'सैराट'मधून कोणतं नवं गाणं गुणगुणायला लावणार, हे पाहणंही औत्सुक्याचं आहे. फँड्री या सिनेमानंतर नागराजच्या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे आता नागराज 'सैराट'मधून प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नितीन केनी, निखिल साने आणि नागराज मंजुळे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी