विजय पाटकर दिग्दर्शित नवा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

विजय पाटकर दिग्दर्शित नवा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

मोहोर

व्ही.जी. एन्टरप्राईजेसचा संगीता गौतम सातदिवे तसेच चंद्रकांत पांढरीनाथ पवार निर्मित ‘मोहर’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांचा भेटीला येत आहे. ‘मोहर’चे दिग्दर्शन जेष्ठ दिग्दर्शक विजय पाटकर यांनी केले आहे.

'मोहर'ची कथा रेखा सुरेंद्र जगताप यांची असून पटकथा, संवाद दीपक भागवत यांनी लिहिले आहे. सहाय्यक दिग्दर्शन राहुल सातदिवे यांनी केले आहे. ‘मोहर’ मध्ये प्रमुख भूमीकेत सयाजी शिंदे, प्रसाद ओक, अदिती सारंगधर असून सोबत विजय कदम, हेमलता बाने दिसणार आहे. मोहोर’ या चित्रपटाद्वारे दोन बाल कलाकार प्राजक्ता जगताप व चैतन्य घाडगे चित्रपटसुष्ट्रीत पदार्पण करीत आहेत.

मोहोर’ चित्रपटात एक दिलखेचक लावणी असून, मानसी नाईकने त्यावर बहारदार नृत्य केले आहे. दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शन केले असून, छाया दिग्दर्शन राजा फडतरे यांचे आहे. वेशभूषा चैत्राली डोंगरे यांची आहे. मिलिंद मोरे यांचे संगीत आहे. गीते राहुल जाधव, अनंत मोरे, सुरेंद्र जगताप यांनी लिहिली असून, स्वरसाज बेला शेंडे, प्रसेनजीत कोसंबी, कविता निकम, च्यांग, साक्षी यांनी चढवला आहे. ‘मोहर’ लवकरच सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी