LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
छबू वेडस बाबू

छबू वेडस बाबू

मराठमोळ्या अँग्री बर्ड्स चा तुफान मॅड कॉमेडीचा दंगा

दहा वर्ष निर्माती म्हणून कार्यरत असणाऱ्या मैथ्थिली जावकर यांनी सह कुटुंब डॉट कॉम, वा सूनबाई वा, देखणी बायको दुसऱ्याची या सारख्या उत्कृष्ट नाटकांची निर्मिती केली आहे. आजवर १८ व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं असून दांडेकरांचा सल्ला, शोभायात्रा, चारचौघी, या दर्जेदार नाटकांचा त्यात समावेश आहे.

लग्न न करू इच्छिणाऱ्या पण घरच्यांच्या अटीमुळे लग्नाच्या बेडीत अडकलेल्या जोडप्याची ही धम्माल कथा आहे. हे लग्न यशस्वी होतं का ? ह्या जोडप्याला त्यांच्या प्रेमाची जाणीव होणार का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या नाटकात पहायला मिळतील. लग्न झाल्यानंतर एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात उडणाऱ्या धम्माल नात्याचा खट्टामीठा अनुभव ह्या नाटकातून आपल्याला घेता येईल. नेहमीच्या शाब्दिक कोटयांबरोबरचे उत्तम प्रसंग हे नाटकाचं वैशिष्टय आहे. मैथ्थिली जावकर, सुचित जाधव आणि विनोदाचा बादशाहा दिगंबर नाईक या तीन पात्रांभोवती या नाटकाची कथा गुंफण्यात आली आहे. प्रसंगनिष्ठ विनोदावर विलक्षण हुकूमत असलेले दिगंबर नाईक या नाटकात सूत्रधाराच्या भूमिकेत आहेत.

सात मजले हास्याची अनुभूती देणाऱ्या या विनोदी नाटकातून मराठमोळ्या अँग्री बर्ड्स चा तुफान मॅड कॉमेडीचा दंगा प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करेल. धम्माल विनोदाचा शिडकाव करणाऱ्या या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १५ ऑगस्टला होणार आहे.

  • निर्माता : राजू बंग आणि मैथ्थिली जावकर ( पिं.चिं.कलारंग प्रतिष्ठान निर्मित आणि अर्चना थिएटर्स प्रकाशित )
  • दिग्दर्शक : प्रशांत विचारे
  • लेखक: राकेश नामदेव शिर्के
  • भूमिका : मैथ्थिली जावकर, सुचित जाधव आणि विनोदाचा बादशाहा दिगंबर नाईक.

टिचक्या

488

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी