LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
दोन स्पेशल

दोन स्पेशल

वृत्तपत्राच्या कार्यालयात घडणारे 'दोन स्पेशल'

हल्लीच प्रदर्शित झालेल्या ‘नागरिक’ या चित्रपटात आजची पत्रकारिता कुठल्या थरापर्यंत जाउ शकते आणि त्यामध्ये एका कर्तव्यनिष्ठ पत्रकाराची काय अवस्था होते, हे पाहिले. पण खूप वर्षांपूर्वी लेखक ह.मो. मराठे यांनी त्यांच्या ‘न्यूज स्टोरी’ या कथेत त्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते.

एका वृत्तपत्राच्या कार्यालयात घडणाऱ्या व पत्रकाराच्या जीवनावर आधारित असलेला 'दोन स्पेशल' पत्रकाराचे आयुष्य, 'त्या' रात्री एका बातमीवरून सुरू झालेला प्रवास आणि त्यातून पुढे घडणाऱ्या घटना यातून हे नाटक उलगडत जाते. नाटकाची निर्मिती अथर्व थिएटर आणि मिश्री थिएटर यांची असून ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांच्या 'न्यूज स्टोरी' या कथेवर हे नाटक आधारित आहे. अभिनेता जीतेंद्र जोशी यांना या नाटकाने 'निर्माता'ही नवी ओळख मिळणार असून अभिनेत्री गिरिजा जोशी या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे.

नाटकाचे लेखक व दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनी 'दोन स्पेशल'बाबत 'लोकसत्ता'शी बोलताना सांगितले, वृत्तपत्रातील उपसंपादकाच्या आयुष्यात घडलेल्या एका वादळाची ही कथा आहे. या उपसंपादकाने जपलेली मूल्ये/तत्त्वे आणि त्याचे प्रेम यातून उभा राहिलेला संघर्ष आणि नाटय़ यात पाहायला मिळेल. नाटकाचे कथानक १९८९-९०च्या काळातील आहे. वृत्तपत्रे, तेथे काम करणारे पत्रकार, कर्मचारी यांच्यासाठी हा मोठय़ा बदलाचा, संक्रमणाचा काळ होता. त्या पिढीचे प्रतिनिधित्व हे नाटक करते.

या नाटकाचे खास वैशिष्टय़ म्हणजे नाटकात पाश्र्वसंगीत नाही तर पाश्र्वध्वनीचा वापर केलेला आहे. या आवाजाच्या साहाय्याने वृत्तपत्राचे कार्यालय, वृत्तपत्राचा छापखाना आणि तो काळ उभा केला आहे. नाटकाचे नेपथ्य व प्रकाशयोजना प्रदीप मुळ्ये यांची असून ध्वनी रेखाटन व वेशभूषा अनुक्रमे अनमोल भावे व दीपा मेहता यांची आहेया नाटकाचे खास वैशिष्टय़ म्हणजे नाटकात पाश्र्वसंगीत नाही तर पाश्र्वध्वनीचा वापर केलेला आहे. या आवाजाच्या साहाय्याने वृत्तपत्राचे कार्यालय, वृत्तपत्राचा छापखाना आणि तो काळ उभा केला आहे. नाटकाचे नेपथ्य व प्रकाशयोजना प्रदीप मुळ्ये यांची असून ध्वनी रेखाटन व वेशभूषा अनुक्रमे अनमोल भावे व दीपा मेहता यांची आहे.

  • निर्माता : अथर्व थिएटर्स/ मिश्री थिएटर्स.
  • दिग्दर्शक : क्षितीज पटवर्धन.
  • लेखक: मुळ लेखक : - ह. मो. मराठे लेखक :- क्षितीज पटवर्धन.
  • प्रकाश योजना: प्रदीप मुळ्ये.
  • नेपथ्य: प्रदीप मुळ्ये.
  • संगीत : अनमोल भावे
  • भूमिका : जीतेंद्र जोशी, गिरीजा ओक-गोडबोले, रोहीत हळदीकर, सुधीर श्रीधर, वैभव शिंदे, सागर महाडिक.

टिचक्या

527

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी