LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
झोपाळा

झोपाळा

कॉलेजवयीन नाटयऊर्जेचा झोपाळा

झोपाळा हे नाटक मराठी साहित्याचे सुप्रसिध्द लेखक व.पु.काळे आणि रत्नाकर मतकरी यांच्या दोन भिन्न कथांवर आधारित आहे.  ‘झोपाळा’ नावाचं हे प्रायोगिक म्हणजे व. पु. काळे आणि रत्नाकर मतकरी या मराठीतल्या दोन प्रथितयश लेखकांच्या त्याच नावाच्या दोन कथांचं नाटयरूप आहे. 

झोपाळा हे नाटक मराठी साहित्याचे सुप्रसिध्द लेखक व.पु.काळे आणि रत्नाकर मतकरी यांच्या दोन भिन्न कथांवर आधारित आहे.  ‘झोपाळा’ नावाचं हे प्रायोगिक म्हणजे व. पु. काळे आणि रत्नाकर मतकरी या मराठीतल्या दोन प्रथितयश लेखकांच्या त्याच नावाच्या दोन कथांचं नाटयरूप आहे. कुणाल आलवे, पराग ओझा, सुशील जाधव या तीन विद्यार्थी दिग्दर्शकांनी ते दिग्दर्शित केलंय. त्यांनीच त्याचं नाटयरूपांतरही केलं आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या नाटकाला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. आजवर झालेले या नाटकाचे सातही प्रयोग हाऊसफुल्ल गेलेत. समीक्षकांकडूनही नाटकाला चांगले गुण मिळतायत. ज्यांच्या कथेवर या नाटकाचा एक अंक आहे, त्या रत्नाकर मतकरींनी या तरुण रंगकर्मीचं कौतुक केलंय. 

कुणाल-पराग-सुशील यांनी पहिल्याच नाटकांसाठी वपु आणि मतकरी यांच्या दोन कथांची केलेली निवड अनेकांना चकित करणारीच होती. मुळात दोन्ही लेखकांच्या लिखाणाची जातकुळी वेगळी. वपु हलकफुलकं लिहिणारे तर मतकरी गूढगंभीर लिहिणारे. त्यामुळे या दोन लेखकांच्या भिन्न जातकुळीतील कथांना नाटयरूपात गुफणं हीदेखील एक मोठी गोष्ट होती.

या दोन कथा नाटकातही स्वतंत्रपणे सादर होतात. पहिल्या अंकात वपुंची कथा सादर होते. ती ५५ मिनिटांची आहे, तर दुस-या अंकात सादर होणारी मतकरींची कथा ३५ मिनिटांची आहे. या कथा स्वतंत्रपणे सादर होत असल्याने दोन ज्यॉनरचं मिश्रण होत नाही. मात्र झोपाळा ही सामायिक गोष्ट दोन्ही नाटकांच्या केंद्रस्थानी आहे.

विशेष म्हणजे कुणाल-पराग-सुशील या तिघांची कामाची शैली वेगळे आहेत. सुशील अभिनेता आहे आणि त्याला लेखनाचीही आवड आहे. कुणाल डबिंग आर्टिस्ट आणि कलाकारीत रस असणारा आहे. पराग हा व्यावसायिक लेखक आहे. त्याने काही कार्टून सीरिज लिहिल्यात. तो ‘यलो’ चित्रपटाच्या रिसर्च टीममध्येही होता. 

  • निर्माता : एम. एल. डहाणूकर कॉलेजचे थियेटर म्यजिक
  • दिग्दर्शक : पराग-कुणाल-सुशील
  • लेखक: व.पु.काळे आणि रत्नाकर मतकरी
  • प्रकाश योजना: जयदीप
  • नेपथ्य: थियेटर म्यजिक
  • संगीत : समीहन
  • भूमिका : प्रथमेश परब, भाग्यश्री शंकपाळ, वेदांती कुळकर्णी, यशोमन आपटे, कुणाल शुक्ल, वैभव राजाध्यक्ष

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी