मराठी टायगर्स - २०१६

मराठी टायगर्स - २०१६

वर्ष २०१६ चे चित्रपट , आगामी चित्रपट, मराठी चित्रपट

प्रस्तावना

सीमावादाचा प्रश्न नेहमीच टोकाला पोहचतो. या महत्त्वपूर्ण विषयावर सिनेमा काढला तर तोसुध्दा वादाच्या भोव-यात अडकतो. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर भाष्य करणारा ‘मराठी टायगर्स’ हा सिनेमा प्रदर्शनापूर्वी चांगलाच चर्चेत राहीला. ब्रिटीशांच्या तावडीतून देश स्वतंत्र झाल्यावर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०५ हुतात्मे झाले आणि महाराष्ट्र वेगळा झाला. प्रत्येकाला आता स्वतंत्र राज्याचा मुद्दा सतावू लागलाय. कित्येक वर्ष महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न कसा गंभीर होत चाललाय, याचं चित्रण सिनेमात पाहायला मिळतं.

सीमाभागात राहणा-यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं याचा वेध दिग्दर्शकाने सिनेमात घेतलाय. तसंच या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर हळुवार फुलत जाणारी प्रेमकथा आणि त्यांच्यासमोर उभ्या ठाकणा-या अडचणी हे सिनेमात अनुभवता येईल.

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे सिनेमात प्रमुख भूमिकेत असून मराठीचा स्वाभिमान त्यांनी सिनेमात अगदी तंतोतंत जपलाय. विक्रम गोखले, आशिष विद्यार्थी, विद्याधर जोशी, तेजा देवकर, अश्विनी एकबोटे आदी सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. सिनेमाचं संगीत या पार्श्वभूमीवर ब-यापैकी साजेसं असून मराठीसोबतच सिनेमाला कानडी टचसुध्दा तेवढाच आहे.

 • प्रस्तुती तिथी: 05 February 2016
 • निर्माता: नवीद हन्गड.
 • दिग्दर्शक: अवधूत कदम.
 • कथा: महेश कोळी.
 • पटकथा: अवधूत बी. कदम आणि प्रताप गंगावणे.
 • गीतकार: दिनकर शिर्के, मंदार चोळकर, शाहीर ला.ना. पवार आणि प्रवीण कुमार.
 • गायक/गायिका: सोनू निगम, अवधूत गुप्ते, आनंद शिंदे, जसराज जोशी, हसिका अय्यर, नेहा राजपाल, स्मिनीत म्हात्रे आणि आस्था त्रिपाठी.
 • संगीत: स्वप्निल दिगडे.
 • भुमिका आणि पात्र:

  डॉ. अमोल कोल्हे, विक्रम कोल्हे, आशिष विद्यार्थी, विद्याधर जोशी, तेजा देवकर, महेश कोळी, किरण शरद, अश्विनी एकबोटे आणि उमा गोखले. तम्मा च्या भूमिकेत विकास पाटील

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक