शिनमा

शिनमा

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट

प्रस्तावना

वेदांत एण्टरटेन्मेंट या संस्थेच्या "शिनमा‘ चित्रपटाची निर्मिती अनिल जोशी यांनी, तर दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केले आहे. आनंद शिंदे यांनी गायलेल्या "तुझी चिमणी‘ गाण्यावर कोरिओग्राफर गणेश आचार्य थिरकताना दिसेल.

आनंद शिंदे यांचे "नवीन पोपट हा‘ हे गाणे कमालीचे लोकप्रिय ठरले होते. आता त्यांचेच "तुझी चिमणी उडाली भुर्र; माझा पोपट पिसाटला‘ हे धमाल गाणे येत आहे. "शिनमा‘ चित्रपटातील हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.चित्रपटाचा विषय गंभीर, परंतु हसत-खेळत मांडला आहे. धमाल संगीत हे चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरेल.

जय अत्रे यांनी लिहिलेल्या या गाण्याला वरुण लिखते यांनी संगीत दिले आहे. आनंद शिंदे यांनी ठसकेबाज आवाजात गायलेल्या या गाण्यावर गणेश आचार्य आणि गुरलिन चोप्रा यांनी दिलखेचक नृत्य केले आहे. चित्रपटातील "कल्ला झाला‘ हे गाणे रोहन-रोहन या संगीतकार द्वयीने संगीतबद्ध केले आहे, तर "असा कसा‘ या गाण्याला दीपाली साठे आणि रोहित राऊत यांनी स्वरसाज चढवला आहे.

"फोर इडियट्‌स‘, "येड्यांची जत्रा‘, "जस्ट गंमत‘ या चित्रपटांनंतर दिग्दर्शक कवडे यांचा हा चौथा चित्रपट असून त्याचे कथानक दुष्काळावर आधारित आहे. अजिंक्‍य देव, किशोरी शहाणे, यतीन कार्येकर, आनंदा कारेकर, विजय पाटकर, संस्कृती बालगुडे, अरुण कदम, अंशुमन विचारे, गणेश यादव, दिगंबर नाईक अशी तगडी "स्टारकास्ट‘ या चित्रपटात आहेत.

  • प्रस्तुती तिथी: 27 November 2015
  • निर्माता: अनिल जोशी ( वेदांत एन्टरटेनमेंट, आउट ऑफ द बॉक्स फिल्म्स )
  • दिग्दर्शक: मिलिंद कवडे
  • कथा: प्रकाश भागवत, मिलिंद कवडे आणि अशोक झगडे.
  • पटकथा: मिलिंद कवडे
  • गीतकार: जय अत्रे, राहुल साळवे आणि सागर वानखेडे .
  • संगीत: वरुण लिखाते आणि रोहन.
  • भुमिका आणि पात्र:

    अजिंक्य देव, किशोरी शहाणे, गुरालीन चोप्रा, यतीन कार्लेकर, विजय पाटकर, संस्कृती बालगुडे, आनंद कार्लेकर, अंशुमन विचारे, गणेश यादव, सौरभ गोखले, अरुण कदम, अभिजित चौहान, दिगंबर नाईक, आशिष पवार, जयवंत वाडकर, निशा परुळेकर.

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक