LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
उर्फी

उर्फी

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट

प्रस्तावना

'टाईमपास' सिनेमातले दगडू प्राजक्ता लोकांच्या घराघरात पोहचले, अनेकांना दगडू शांताराम परब आणि प्राजक्ताची ही स्टोरी स्वतःचीच वाटली. आणि आता हा दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब 'देवा' बनून तुम्हाला पुन्हा भेटायला येतोय. प्रथमेशचा नवा मराठी सिनेमा येतोय ज्यात प्रथमेश देवा या मुख्य भुमिकेत दिसणार आहे. 'टाईमपा'सच्या आधी प्रथमेश 'बालक पालक' या सिनेमात विश्याच्या भूमिकेत आपल्याला दिसला होता, त्यानंतर तो 'बीपी', 'झोपाळा' या मराठी नाटकातनं दिसला आणि त्याहीनंतर तो दिसला ते अजय देवगणच्या 'दृष्यम' या हिंदी सिनेमामध्ये. प्रथमेशच्या अभिनयाची ही गाडी सुरु असतानाच तो मराठीच्या मोठ्या पडद्यावर कधी दिसणार असा प्रश्न त्याला त्याचे चाहते विचारत होते. ज्याला प्रथमेशने 'उर्फी' या सिनेमातनं उत्तर दिलंय. 'उर्फी' या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज झालाय. ज्यात प्रथमेश देवाच्या 'रफ अँड टफ' लूकमध्ये दिसतोय. 'उर्फी' ही एक प्रेमकथा असून त्यात धमाल मस्तीचा त़डका दिसेल. उपेंद्र लिमये, कविता लाड, मिलिंद पाठक आदी कलाकार यात दिसणार आहेत तर यात प्रथमेशची हिरोईन असेल मिताली मयेकर. मितालीला यापुर्वी आपण रेड चिलीज् निर्मित 'बिल्लू' या हिंदी सिनेमात इरफान खानच्या मुलीची भूमिका साकारताना पाहीले होते. 'उर्फी' या सिनेमाचे दिग्दर्शन केलेय विक्रम प्रधान याने तर निर्मिती स्वप्ना प्रधान यांची आहे. क्षितीज पटवर्धन, मंगेश कांगणे यांनी या सिनेमात गीते लिहीलीत ज्याला सूरबद्ध केलंय चिनार महेश या संगीतकार जोडीने. येत्या २७ नोव्हेंबरला 'उर्फी' सिनेमामधून हा देवा आपल्या भेटणार आहे...सो तय्यार रहा बरं...

  • प्रस्तुती तिथी: 27 November 2015
  • निर्माता: स्वप्ना प्रधान, युवराज वर्मा, सर्तेज मिर्झा आणि महलेका शेख (एन्बिएस इंटरटेन्मेंट प्रा.ली. आणि ब्रेनव्हेव प्रोडक्शन )
  • दिग्दर्शक: विक्रम प्रधान
  • कथा आणि पटकथा: विक्रम प्रधान
  • गीतकार: क्षितीज पटवर्धन, मंगेश कांगणे
  • संगीत: चिनार महेश
  • भुमिका आणि पात्र:

    प्रथमेश परब, मिताली मयेकर, उपेंद्र लिमये, कविता लाड, मिलिंद पाठक,

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक