LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
सिटीजन

सिटीजन

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट, सिटीजन : ऑफ द पीपल , बाइ द पीपल, फॉर द पीपल.

प्रस्तावना

१६ ऑक्टोबरला चित्रपटगृहांत दाखल होणारा ‘सिटीझन’ तरुणाईच्या भावविश्वावर भाष्य करणारा असून, हा चित्रपट महाविद्यालयीन तरुणाईसह सर्वांनाच आपला वाटेल. सर्वच प्रेक्षक या चित्रपटात गुंततील' असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे. ‘सिटीझन’ हा वेगळा जाणीवसंपन्न मनोरंजक सिनेमा घेऊन दिग्दर्शक अमोल शेटगे, अभिनेत्री राजश्री लांडगे, कॅमेरामन सुरेश देशमाने हे मराठी चित्रपटसृष्टीतील तीनजण एकत्र आले आहेत.

या चित्रपटाच्या गोष्टीत सिनेरसिक स्वतःला शोधणार आहेत, त्यांच्या आयुष्याशी हा चित्रपट रिलेट होणारा आहे. चित्रपटाचे सर्व लोकेशन्स अगदी नवीन वाटणारे आणि फ्रेश आहेत. प्रसन्न, प्रफुल्लीत करणारे ठिकाणं या चित्रपटात असून, चित्रपटाचा प्रसन्नतेचा धागा त्या लोकेशन्समधूनही गुंफला गेला आहे.

कृष्णराज फिल्म्स बॅनर प्रस्तुत अमोल शेटगे, राजश्री लांडगे, सुरेश देशमाने निर्मित ‘सिटीझन’ हा एक युथबेस सिनेमा आहे. आजच्या तरुणाईचा आवाज 'सिटीझन' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अनेक फ्रेश चेहरे या चित्रपटात दिसणार आहेत. हा विषय चित्रपटातून मांडणं गरजेचं असल्यामुळेच अमोल शेटगे, राजश्री लांडगे, सुरेश देशमाने या तिघांनी एकमताने या चित्रपटाच्या निर्मितीकरिता पुढाकार घेतला.

‘सिटीझन’ चित्रपटाची कथा अमोल शेटगे व राजश्री लांडगे यांची आहे. सुरेश देशमाने याचं छायांकन असून कलादिग्दर्शन संतोष फुटाणे यांचं आहे. संकलन सर्वेश परब यांनी केलं आहे. राजश्री लांडगे, राकेश वशिष्ठ, यतीन कार्येकर, पुष्कर श्रोत्री, उदय टिकेकर, नंदिता जोग, श्रीरंग देशमुख, माधव देवचक्के, कौस्तुभ दिवाण, सुषमा देशपांडे, ऋषी देशपांडे, प्रतीक जंजिरे, सुनील रानडे आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत.

चित्रपटाच्या माध्यमातून कॉलेज जीवनाचे वास्तव उत्तमप्रकारे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिग्दर्शकांना जे वास्तव अधोरेखित करायचं आहे ते अनेकांना माहीत आहे; पण ते स्वीकारून त्यात बदल करण्याची धमक फार कमीजण दाखवतात. एक चांगला विचार मांडण्याचा प्रयत्न ‘सिटीझन’ चित्रपटात करण्यात आला आहे. येत्या १६ ऑक्टोबरला ‘सिटीझन’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

  • प्रस्तुती तिथी: 16 October 2015
  • निर्माता: राजश्री लांडगे, अमोल शेटगे, सुरेश देशमाने.
  • दिग्दर्शक: अमोल शेटगे
  • कथा: अमोल शेटगे , राजश्री लांडगे
  • पटकथा: अमोल शेटगे
  • संगीत: अविनाश-विश्वजीत
  • भुमिका आणि पात्र:

    राजश्री लांडगे, राकेश वशिष्ठा, याटीन कार्येकर, पुष्कर श्रोत्री, उदय टीकेकर, नांदिता जोग, श्रीरंग देशमुख, माधव डेवचक्के, कौस्टूभ दिवाण, सुषमा देशपांडे, ऋषि देशपांडे, प्रतीक जंजिरे, सुनील रानडे.

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी