LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
ढोलकी

ढोलकी

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट

प्रस्तावना

महाराष्ट्राची लोककला तमाशा ..आणि या तमाशाने अनेकांना भुरळही घातली पण या तमाशाची जान असणार एक वाद्य म्हणजे ढोलकी..आता याच ढोलकीचा आवाज ..आणि ही जादुई ढोलकीचा सुर आता राजु देसाई ,विशाल देसाई दिग्दर्शित ढोलकी या मराठी चित्रपटाच्या माध्यमातुन ऐकता येणार आहे...येत्या २८ ऑगस्टला तो राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय..या चित्रपटात सयाजी शिंदे,सिध्दार्थ जाधव,मानसी नाईक, काश्मीरा कुलकर्णी...या कलावंताच्या भूमिका आहेत.

ढोलकी हा ग्रामीण ,राजकीय,सामाजिक प्रश्नावर व्यंगात्मक पध्दतीने प्रहार करणारा चित्रपट आहे. आपल्या आजुबाजुला असणा-या विविध प्रवृतीचे लोक , मुखवटे धारण करुन सर्वसामान्य लोकांचा गैरफायदा घेतात..... या चित्रपटात लाला नावाची ही भूमिका सिध्दार्थ जाधव साकारतोय. एका कुंभकर्णाला लाज वाटावी..असा झोपाळु तरुण गावाने त्याला आडवाच वाढताना पाहीलाय. उभा कधीच दिसला नाही.त्यामुळे तो गावाचा चेष्टेचा विषय झालेला.पण अचानक एक चत्मकार घडतो.त्याच्या बोटातुन जादुई ढोलकीचे सूर निघू लागतात.

त्याने कुठेही दगडावर,लाकडावर ,जमिनीव वाजवले तरी ढोलकीचा आवाज येतो...तो भजन आणि प्रार्थनेचाही तमाशा करतो..तर गावाची सुंदर तरुणी रखमा ही भूमिका साकारणारी( कश्मीरा कुलकर्णी ) ही लालाच्य प्रेमात पडते..पण लाल्याची आई खऱ्या ढोलकीवर फक्त भजनाचाच ठेक्याचा रियाज करण्याची शपथ घालते....पण तरीही न ऐकणा-या लाला लालीबाई घाडीगावकरच्या तमाश मंडळी त्याला ढोलकी वाजवायला प्रवृत्त करतात..आणि तिथुन चित्रपटाच्या मुख्य कथेला सुरवात होते....हा एक आगळ्या वेगळ्या धाटणीचा मंनोरजक पध्दतीने चित्रपट तयार करण्यात आला आहे..या चित्रपटाचे निर्माते शिरीश पट्टनशेट्टी,मदन पोडवाल आहेत..संगीतकार टब्बी-परिख याचे असुन कथा पटकथा संवादलेखन श्याम दंडवते यांनी केलय...येत्या २८ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

  • प्रस्तुती तिथी: 28 August 2015
  • निर्माता: शिरीश पट्टनशेट्टी,मदन पोडवाल
  • दिग्दर्शक: राजु देसाई ,विशाल देसाई
  • कथा आणि पटकथा: श्याम दंडवते
  • संगीत: टब्बी-परिख
  • भुमिका आणि पात्र:

    सयाजी शिंदे,सिध्दार्थ जाधव,मानसी नाईक, काश्मीरा कुलकर्णी, ज्योती चांदेकर, संजय कुलकर्णी, डॉ विलास उजवणे, विजय निकम आणि वंदना.  

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी