LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
एक अलबेला

एक अलबेला

आगामी चित्रपट, मराठी चित्रपट

प्रस्तावना

‘एक अलबेला’ या सिनेमाचं काल पासून शूटींग सुरू झालं आहे. मंगेश देसाई हा अभिनेता भगवान दादा यांची भूमिका साकारत असून शेखर सरतांडेल हे या सिनेमाचं दिग्दर्शन करीत आहेत. त्यामुळे अनेकांच्या दिलाची धडकन असलेली विद्या लवकरच तिच्या चाहत्यांना मराठी सिनेमात बघायला मिळणार आहे.

‘एक अलबेला’ हा मराठी सिनेमा येत असून यात बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री विद्या बालन बघायला मिळणार आहे. या सिनेमात विद्या गीता बाली यांची भूमिका साकारणार आहे.पल्या दमदार अदाकारी आणि वेगळ्या डान्स शैलीमुळे लोकप्रिय असलेल्या भगवान दादा यांच्या जीवनावर आधारीत आहे.

सध्या मराठी सिनेमाच्या कन्टेंटची चर्चा बॉलिवूडमध्ये नेहमीच रंगलेली असते. अनेक मोठे स्टार मराठी सिनेमे बघून त्याचं कौतुकही करत असतात. तर अनेक हिंदी कलाकार मराठीत कामही करीत आहे. सलमान खान याने ‘लय भारी’मध्ये तर ‘हुमा कुरेशा आणि तिस्का चोप्रा हिने ‘हायवे’ या मराठी सिनेमात काम केले आहे.

विद्याचे अनेक हिंदी सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. विद्याच्या अनेक भूमिका आजही तिच्या चाहत्यांच्या मनात घर करून आहेत त्यामुळे आता ती मराठी सिनेमातही दिसत असल्याने तिचे मराठी चाहते नक्कीच सुखावतील. शिवाय विद्या मराठीत कसे काम करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • निर्माता: डॉ मोनीश बाबरे ( किमया मोशन पिक्चर्स )
  • दिग्दर्शक: शेखर सार्तनदेल
  • लेखक: शेखर सार्तनदेल आणि अमोल शेटगे.
  • पटकथा: शेखर सार्तनदेल आणि अमोल शेटगे.
  • संगीत: संतोष मुळेकर.
  • भुमिका आणि पात्र:
    • विद्या बालन - गीता बालीच्या भूमिकेत,
    • मंगेश देसाई - भगवान दादाच्या भूमिकेत,
    • विद्याधर जोशी, प्रसाद पंडित, स्वप्नील राजशेखर, विघ्नेश जोशी, शेखर फडके, श्रीराम कोल्हटकर, अरुण भाडसावले.

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी