LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
ख्वाडा

ख्वाडा

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट, राज्य चित्रपट महोत्सवात ख्वाडाचा दबदबा

प्रस्तावना

राज्य चित्रपट महोत्सवात ख्वाडाचा दबदबा. दोन पुरस्कार व पाच नामांकन जाहिर.

५२ महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात भाउराव क-हाडे निर्मित व दिग्दर्शित ख्वाडा चित्रपटास रंगभूषा व वेशभूषासाठी पुरस्कार जाहीर झाले तर सर्वोत्कृष्ट चिञपट, प्रथम पदार्पण निर्मिती ,प्रथम पदार्पण दिग्दर्शक , उत्कृष्ट संवाद व उत्कृष्ट गीते यासाठी नामांकन झालं आहे.

सरत्या आठवड्यात नगर जिल्ह्याच्या कलाप्रांताला सोन्याचे नवे करकरीत पान जोडले गेले. सदा प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करणार्‍या श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी या आजवर दुर्लक्षित गावातील एका शेतकर्‍याच्या पोराने थेट राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या 'रजतकमळा'ला गवसणी घातली.

नियती अन् परिस्थितीने घातलेल्या अनेक 'खोड्यां'ना पुरुन उरत भाऊराव नानासाहेब कर्‍हाडे या कालपर्यंत कोणाच्याही गिणतीत नसलेल्या मनस्वी दिग्दर्शकाने 'ख्वाडा' या चित्रपटाच्या माध्यमातून नगरच्या आणि मराठी चित्रपटप्रांताला सुवर्ण झळाळी दिली. चित्रपटाचा स्पेशल ज्युरी अवॉर्ड आणि ध्वनीमुद्रणाचा पुरस्कार या चित्रपटाने पटकावला, नगरच्या कलाप्रांतात हे प्रथमच घडले. भाऊरावची मजल कोणत्या उंचीची आहे, हे समजून घेण्यासाठी आधी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समजून घेतले पाहिजे.

जगाला वेड लावणार्‍या ऑस्कर एवढाच किंबहुना भारतीय चित्रपटासाठी त्याहून काकणभर सरस, असा हा पुरस्कार! सत्यजीत रॉय, अदूर गोपालक्रिष्णन, राजा परांजपे या आशयघन चित्रपट घडविणार्‍या बाप माणसांनी या पुरस्कारांना प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे आयुष्यात भरुन पावले, अशीच चित्रपट कलावंतांची भावना असते. अगदी अभिनयाचा बादशहा अमिताभ बच्चन यांचेच उदाहरण घ्यायचे, तर त्यांना या पुरस्कारासाठी थेट १९९१ च्या 'अग्निपथ'पर्यंत थांबावे लागले. तेव्हा कुठे ते अभिनयातील सवरेत्तम 'सुवर्णकमळा'पर्यंत पोहचले. त्यामुळे या पुरस्कारांची तुलना चॅनलनिहाय 'वाटल्या' जाणार्‍या कचकड्या पुरस्कारांशी होऊच शकत नाही. यावरुन भाऊरावने मारलेल्या हनुमानउडीचा अंदाज येतो. 'ख्वाडा' घडविण्याची चित्तरकथा ऐकली तरी एक नवा 'ख्वाडा' घडेल, एवढे भावनिक चढउतार, खस्ता, निंदा, अवहेलना, पराभव भाऊरावच्या आयुष्यात आले.

'लोकमत'च्या मैत्र पुरवणीत पुण्याच्या इंडियन फिल्म इन्स्टिट्यूटचा लेख वाचून आपणही चित्रपट घडवावा, हे स्वप्न उघड्या डोळ्यांनी पहावे, ते पूर्ण करण्यासाठी जमीन-जुमला विकावा, एका स्वप्नाच्या मागे धावताना आयुष्य पणाला लावावे, हे सारेच अतक्र्य! पण ते वास्तवात घडले. 'ख्वाडा'तून एका स्थलांतरित कुटुंबाची चित्रचौकट साकारताना भाऊराव कदाचित जगलेला प्रत्येक क्षण कॅमेराबद्ध करत होता. म्हणूनच 'ख्वाडा' हृदयात खोलवर उतरत असावा. आजवर दोन ठिकाणी नामांकन झालेल्या या चित्रपटाने थेट पुरस्कारालाच गवसणी घातली, हे त्याचेच द्योतक!

  • प्रस्तुती तिथी: 22 October 2015
  • प्रस्तुती तिथी:
  • निर्माता: विठ्ठलराव नानासाहेब का-हाडे
  • दिग्दर्शक: भाऊराव का-हाडे
  • लेखक: भाऊराव का-हाडे
  • पटकथा: भाऊराव का-हाडे
  • गीतकार: मंदार चोळकर, फ्रांसिस, दीपक अंगेवार
  • संगीत: रोहित नागभिडे
  • भुमिका आणि पात्र:

    शशांक शेंडे, अनिल नगरकर, भाऊ शिंदे, सुरेखा, योगेश डिंबळे, रसिका चव्हाण, वैष्णवी ढोरे, चंद्रकांत धुमाळ, प्रशांत इंगळे, वैशाली केंडले, अमोल थोरात, हेमंत कदम.

  • पारितोषिके:

पारितोषिके

1) Best Director Award- PIFF 2015

2) 62nd National Film Awards: All India category, Our film Khwada-ख्वाडा Won two Awards --

  • a)Silver Lotus Award (Rajat Kamal) for Best Audiography (Location Sound Recordist) - Mahavir Sabannavar
  • b) Special Jury Award -

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी