LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
मुंगळा

मुंगळा

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट, पेटलेल्या पाण्यावर ‘मुंगळा’ घालणार फुंकर!

प्रस्तावना

गावोगावचा ज्वलंत मुद्दा म्हणजे पाणी आणि वीज. वेळोवेळी संपूर्ण महाराष्ट्रात पाणी समस्या पेटत असते, त्यावर फुंकर घालून ती समस्या कशी विझवायची यावर भाष्य करणारा मराठी चित्रपट ‘मुंगळा’ येत्या २ ऑक्टोबरला चित्रपटगृहांत दाखल होत आहे.

साई मोहन एन्टरटेनमेंट व गौरव भानुशाली निर्मित ‘मुंगळा’चे दिग्दर्शन विजय देवकर यांनी केले असून कथा, पटकथा तसेच संवादही त्यांचेच आहेत. चारही आघाड्यांवर त्यांनी ही जबाबदारी पार पाडली आहे. ‘मुंगळा’मध्ये प्रमुख भूमिकेत लोकेश गुप्ते, गणेश यादव, जोती जोशी, सुहास पळशीकर, चेतन दळवी असून सोबत राम कदम, मृणाली जांभळे, हरी ठुमके, महेश फाळके, मुकेश जाधव, भूषण घाडी, दीपक करंजीकर, जनार्दन परब, वैजनाथ चौगुले, गौरी देशमुख, सविता हांडे, आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘मुंगळा’ चित्रपटात ३ गाणी असून आयटम सॉंग अतुल लोहार यांनी संगीतबद्ध केले असून रचना त्यांनीच लिहिली आहे. सदर गाणे त्यांच्यासोबत विभावरी सातर्डीकरने गायले आहे. इतर गाणी विजय गावंडे यांनी संगीतबद्ध केली असून, मंदार चोळकर यांच्या रचना आहेत. तसेच नेहा राजपाल व आदर्श शिंदे यांनी पार्श्वगायन केले आहे.

चित्रपटात एक भन्नाट आयटम गाणे असून सारा श्रवण हिने त्यावर दिलखेचक नृत्य सादर केले आहे. गुणी राजेश बिडवे याने नृत्य दिग्दर्शन केले आहे. ‘मुंगळा’चे छाया दिग्दर्शन जितेंद्र आचरेकर असून फैसल इमान यांनी संकलन केले आहे.

  • प्रस्तुती तिथी: 02 August 2015
  • निर्माता: साई मोहन एन्टरटेनमेंट व गौरव भानुशाली
  • दिग्दर्शक: विजय देवकर
  • कथा आणि पटकथा: विजय देवकर
  • गीतकार: मंदार चोळकर
  • गायक/गायिका: विभावरी सातर्डीकर, नेहा राजपाल व आदर्श शिंदे.
  • संगीत: अतुल लोहार, विजय गावंडे
  • भुमिका आणि पात्र:

    लोकेश गुप्ते, गणेश यादव, जोती जोशी, सुहास पळशीकर, चेतन दळवी असून सोबत राम कदम, मृणाली जांभळे, हरी ठुमके, महेश फाळके, मुकेश जाधव, भूषण घाडी, दीपक करंजीकर, जनार्दन परब, वैजनाथ चौगुले, गौरी देशमुख, सविता हांडे.

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी