LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
राजवाडे अ‍ॅण्ड सन्स

राजवाडे अ‍ॅण्ड सन्स

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट, ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’च्या बदलत्या कुटुंबाची कहाणी

प्रस्तावना

‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ ही एका परीवाराची कथा असून त्यांचे आनंद, त्यांचे दु:ख, त्यांचे विचार, पिढ्यांमधील अंतर हे सर्व या कथानकातून बघायला मिळणार आहे. चित्रपट एकाच वेळी तीन पिढ्यांना दाखवतो आहे. तरुण मुलांना दाखवतानाही नवतरुण (अलोक राजवाडे, सिद्धार्थ मेनन, मृण्मयी गोडबोले, कृतिका देव) आणि थोडेसे परिपक्व तरुण (अतुल कुलकर्णी, अमित्रियान पाटील) असे दोन वर्ग पडतात. त्यामुळे पात्रांची वेशभूषाही इथे खूप महत्त्वाची असावी. सचिन खेडेकर, अतुल कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, सतीश आळेकर, ज्योती सुभाष, सिद्धार्थ मेनन, अलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, कृतिका देव, पौर्णिमा मनोहर, राहुल मेहंदळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांनीच केलं असून सिनेमाची निर्मिती वाय.एम.देवस्थळी आणि काफी कमेरा यांनी केली आहे. अनेक दिवसांनी मराठीत पुन्हा एकदा असा एक चित्रपट आला आहे, जो आवर्जून पाहावा. त्यातल्या काही अंमळ फसलेल्या जागांसह तो आवडावा, थोडासा आपणही जगावा आणि थोडासा दुसऱ्याला जगवावा. लहान मोठे ‘राजवाडे’ आपल्या आजूबाजूला किंवा कदाचित आपल्यातही आहेत. म्हणूनच ‘राजवाडे अॅण्ड सन्स’ आपल्यास नकळत ‘राजवाडे अॅण्ड अस’ किंवा ‘राजवाडे अॅण्ड मी’ होतो. ‘राजवाडे म्हणजे आम्हीच’ असं वाटणं, हेच चित्रपटाचं खरं यश आहे. ‘डिजीटल पोस्टर’ची आगळीवेगळी संकल्पना घेऊन येणारा हा सिनेमा दि. 16 ऑक्टोबरपासून जवळच्या ‘मुव्ही स्क्रीन्स’वर येत आहे.

  • प्रस्तुती तिथी: 16 October 2015
  • निर्माता: सचिन कुंडलकर, वाय. एम. देवस्थळी अतुल कुलकर्णी व कॅफे कॅमेरा.
  • कथा आणि पटकथा: सचिन कुंडलकर
  • गीतकार: तेजस मोडक.
  • संगीत: देबर्पिटो, अद्रिअन डिसोजा, तेजस मोडक.
  • भुमिका आणि पात्र:

    अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, सतीश आळेकर, ज्योती सुभाष, सिद्धार्थ मेनन, आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, कृतिका देव, पुर्णिमा मनोहर, राहुल मेहंदळे, अमित्रीयन पाटील, सुहासिनी धडफळे.

कथानक

‘राजवाडे अॅण्ड सन्स’ म्हणजे अगदी पूर्णपणे तरुणाईचा चित्रपट नाही. ही कहाणी आहे आपल्या परंपरा, मूल्य, संस्कार, सामाजिक व व्यावसायिक स्थान, व्यवसायाचा डोलारा वगैरे बाबींचं जतन करणाऱ्या एका मराठी कुटुंबाची. ‘मराठी’ म्हटलं की सहसा ‘मध्यमवर्गीय’ हा शब्द अध्याहृतच असतो. ‘राजवाडे’सुद्धा मध्यमवर्गीय आहेत, मात्र आर्थिकदृष्ट्या नव्हे, वैचारिकदृष्ट्या. पुण्यातलं एक भलंमोठं प्रस्थ, ज्यांचे अनेकविध व्यवसाय यशस्वीरीत्या चाललेले आहेत आणि समाजात ज्यांचं नाव अतिशय विश्वास व आदराने घेतलं जातं असं ‘राजवाडे’ कुटुंब. एकत्र कुटुंब व कौटुंबिक व्यवसायाची जबाबदारी असलेल्या राजवाडे कुटुंबाची तिसरी पिढी, त्यांच्या आई-वडील, आजोबांनी लादलेल्या बंधनांत स्वत:ला बांधून घेताना धुसफुसते आहे. सळसळत्या तरुणाईला अडवलं, बांधलं जात आहे आणि तिला मुक्तपणे विहरायचं आहे, आभाळाचा ठाव घ्यायचा आहे. बंड करून उठलेल्या, क्रांतिकारी तरुणाईसमोर भल्याभल्यांचा टिकाव लागलेला नाही, हा तर इतिहासच आहे, पण हे होतं कसं आणि नेमकं काय होतं हे ‘राजवाडे अॅण्ड सन्स’मध्ये पाहणं, हा एक जबरदस्त अनुभव आहे.

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी