LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
तू हि रे

तू हि रे

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट

प्रस्तावना

‘तू ही रे’ या सिनेमाची सध्या चांगलीच उत्सुकता वाढली असून ही उत्सुकता या सिनेमातील नुकत्याच रिलिज करण्यात आलेल्या ‘गुलाबाची कळी’ या गाण्याने आणखीने वाढवली आहे. ‘दुनियादारी’ आणि ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ या रोमॅंटिक सिनेमांच्या दमदार यशानंतर संजय जाधव पुन्हा एकदा एक अफलातून सिनेमा घेऊन येत आहेत. सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी आणि तेजस्वीनी पंडीत अशी तगडी स्टारकास्ट यात बघायला मिळणार आहे. ‘गुलाबाची कळी’ हे या सिनेमातील गाणं रिलिज करण्यात आलं असून हे गाणं स्वप्नील जोशी आणि तेजस्वीनी पंडीत यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे.

तर लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि अमितराज यांच्या आवाजात हे रेकॉर्ड करण्यात आलं आहे. ठेका धरायला लावणारं संगीत आणि चाल मनाला भावणारी झालीये. तर गाण्याचं चित्रीकरणही सुंदर आणि देखणं झालंय. दोघांचाही डोळ्यांचा अभिनय हळूच गालात हसू फुलवणारा झालाय. बघा हे गाणं ....

  • प्रस्तुती तिथी: 04 September 2015
  • निर्माता: मृदुला पदावाल ओझा, शीतल मणेरे, उत्पल आचार्य,आशिष वाघ आणि दीपक पांडुरंग राणे.
  • दिग्दर्शक: संजय जाधव
  • कथा: मनस्विनी लता रविंद्र
  • गीतकार: गुरु ठाकूर
  • गायक/गायिका: आनंद शिंदे, वैशाली सामंत
  • संगीत: अमितराज आणि पंकज पडघम.
  • भुमिका आणि पात्र:

    स्वप्नील जोशी, सी ताम्हणकर, स्वप्निल, तेजस्विनी पंडित, सुशांत शेलार, मृणाल जाधव.

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी