LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
वाजलाच पाहिजे

वाजलाच पाहिजे

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट, गेम की सिनेमा

प्रस्तावना

चॅनल यू इन्टरटेनमेंट प्रस्तुत, आतिफ निर्मित, आर विराज दिग्दर्शित ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ हा सिनेमा विनोदी ढंगाचा आहे. चित्रपट तयार करताना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते आणि चित्रपट निर्मिती कशा प्रकारे होते यावर गमतीशीर भाष्य करणारं या चित्रपटाचं कथानक आहे. भाऊ कदम, राजेश भोसले, चिन्मय उदगीरकर, गिरीजा जोशी, आरती सोलंकी संजय मोहिते आदी कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. लवकरच हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.  

चित्रपटातील मुख्य कलाकार, शीर्षक, ट्रेलर, कथा आणि संदावादातून हा चित्रपट प्रेक्षेकांचे फुल टू मनोरंजन करेन असे दिसते. चित्रपटाची कथा–पटकथा-संवाद बाळ-अमोल यांची आहे. सह-निर्मात्याची जबाबदारी हेमंत अणावकर तर कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी मंगेश जगताप यांनी सांभाळली आहे. येत्या ११ सप्टेंबरला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे..

  • प्रस्तुती तिथी: 11 September 2015
  • निर्माता: अतिफ खान ( चनेल यु इंटरटेनमेंट )
  • दिग्दर्शक: आर. विराज.
  • लेखक: पराग कुलकर्णी.
  • पटकथा: बाल-अमोल.
  • गीतकार: हरिदास कड आणि मंदार चोळकर.
  • गायक/गायिका: आदर्श शिंदे, प्रवीण कुंवर, रोहित राउत, अवधूत गुप्ते, रेश्मा सोनावणे आणि आनंदी जोशी.
  • संगीत: मधु कृष्णा आणि प्रफुल्ल कार्लेकर.
  • भुमिका आणि पात्र:

    भालचंद्र (भाऊ) कदम, चिन्मय उदगीरकर, गिरीजा जोशी, राजेश भोसले आणि आरती सोलंकी  

कथानक

दोन अवलियांची धमाल गोष्ट सांगणारा हा चित्रपट. हे दोघेजण सिनेमा काढण्यासाठी कशी धडप़ड करतात. त्यांच्या या धडपडीत काय काय घडतं. त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं.हे या सिनेमात अत्यंत रंजकपणे मांडण्यात आलं आहे. ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ चित्रपटाच्या शीर्षकावरून आपण दादा कोंडकेंच्या चित्रपटांच्या हटके शीर्षकांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. .

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी