LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
वक्रतुंड महाकाय

वक्रतुंड महाकाय

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट, बाल गणेश पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

प्रस्तावना

लहान मोठ्या भक्तांचा लाडका गणपती बाप्पा लवकरच त्याच्या घरी यायला सज्ज झाला आहे. यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार असला तरीही या सणाची रंगत आणखी वाढणार आहे 'वक्रतुंड महाकाय' या सिनेमामुळे. २५ सप्टेबर रोजी प्रदर्शित होणारा हा सिनेमा मनोरंजक आणि आपल्या सभोवतालच्या परिस्थितीची जाण करवून देणारा आहे. सिनेमातील प्रमुख भूमिका साकारणारा अल्ताफ (नमन जैन) आणि त्याचा मित्र झालेला गणपतीचा बाहुला याची रंजक गोष्ट सिनेमातून मांडली आहे.

सिनेमाची कथा हा गणपतीचा बाहुला आणि त्याच्या भोवती फिरणाऱ्या व्यक्तीरेखांबद्दल आहे. त्यामुळे असा हा गणपती प्रत्येकाला त्याच्या भरकटलेल्या वाटेवरून योग्य ठिकाणी कशाप्रकारे नेऊन ठेवतो याची कहाणी सिनेमात अतिशय उत्कृष्टरित्या गुंफली आहे. सिनेमात राष्ट्रीय पारितोषिक विजेता लेखक विजय मोरया याची देखील प्रमुख भूमिका आहे. घातपाती कारवाया घडवून आणण्याच्या उद्देशाने आलेल्या आतंकवाद्याची भूमिका त्याने वठवली आहे. या सिनेमाचं विशेष म्हणजे निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा मराठी चित्रपट निर्मितीचा पहिलाच प्रयत्न आहे. इ

- सेन्स मोशन पिक्चर्स, बोहरा ब्रोज, अलुम्ब्रा एंटरटेनमेंट्स, सिख्या एंटरटेनमेंट्स, सबॅकॉम यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात उषा नाडकर्णी, नमन जैन, प्रार्थना बेहेरे, नचिकेत पूर्णपात्रे, राहुल पेठे, विनायक भावे, जयंत सावरकर, शशांक शेंडे, ऋषी देशपांडे यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन पुनर्वसु नाईक तर लेखन योगेश विनायक जोशी यांनी केले आहे. छाया दिग्दर्शन मितेश मिरचंदानी, संकलक आशिष म्हात्रे -अपूर्वा मोतीवाले, संगीत संकेत नाईक- संकर्षण किणी, वेशभूषाकार सचिन लोवलेकर - दीप्ती म्हात्रे यांनी केलं आहे. हिंदी आणि मराठी भाषेतील हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांना आवडेल.

--प्रणाली साळुंके 

  • प्रस्तुती तिथी: 25 September 2015
  • निर्माता: अनुराग कश्यप, गुणित मोंगा, सुनील बोहरा, अंशुमन जैन - सेन्स मोशन पिक्चर्स, बोहरा ब्रोज, अलुम्ब्रा एंटरटेनमेंट्स, सिख्या एंटरटेनमेंट्स, सबॅकॉम
  • दिग्दर्शक: पुनर्वसु नाईक
  • लेखक: योगेश विनायक जोशी
  • संगीत: संकेत नाईक - संकर्षण किणी
  • भुमिका आणि पात्र:

    नमन जैन,उषा नाडकर्णी, प्रार्थना बेहेरे, नचिकेत पूर्णपात्रे, राहुल पेठे, विनायक भावे, जयंत सावरकर, शशांक शेंडे, ऋषी देशपांडे, विजय मोरया.

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी