LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
दिल दोस्ती दुनियादारी

दिल दोस्ती दुनियादारी

  • टीव्ही मालिका : दिल दोस्ती दुनियादारी
  • टीव्ही चॅनेल: झी मराठी 
  • प्रारंभाची तारीख: ९ मार्च २०१४ पासून.....
  • मालिकेची वेळ : सोमवार ते शनिवार रात्रौ १०.३० वाजता.
  • कथा: संजय जाधव आणि आशिष पाथरे
  • प्रस्तुती : संजय जाधव
  • दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
  • भूमिका : अमेय वाघ, सुव्रत जोशी, पुष्कर चिरपुटकर, सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि स्वानंदी टिकेकर

कथा बाह्यरेखा

दिल दोस्ती दुनियादारीची कथा आहे घरापासून दूर राहणा-या सहा मित्र मैत्रिणींची. कैवल्य, आशुतोष, सुजय, अॅना, मीनल आणि रेश्मा असे हे सहा जण एकत्र आलेय स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत.

दिल दोस्ती दुनियादारीची कथा आहे घरापासून दूर राहणा-या सहा मित्र मैत्रिणींची. कैवल्य, आशुतोष, सुजय, अॅना, मीनल आणि रेश्मा असे हे सहा जण एकत्र आलेय स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत. यातील प्रत्येक जण वेगवेगळ्या उद्देशाने मुंबईत आलेला आहे. यात कुणाचा करिअरचा स्ट्रगल आहे तर कुणाचा काही तरी फॅमिली प्रॉब्लेम आणि हा स्ट्रगलच या सर्वांमधील एक समान धागा आहे. घरापासून आणि कुटुंबापासून दूर आलेल्या या सहा जणांचं एक नवं कुटुंब तयार झालं आहे ज्यात मैत्री, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम आणि सोबतच धम्माल, मजा मस्तीही आहे. यातील प्रत्येकाने उराशी जोपासलंय एक स्वप्न. विविध स्तरातून आणि पार्श्वभूमीतून आलेला हा प्रत्येकजण आपापली स्वप्नं साकार करण्यासाठी या शहरात आलाय जिथे पावलापावलावर आहेत नवे अडथळे, नवी आव्हाने आणि नवे संघर्ष. या संघर्षांना  एकमेकांच्या साथीने तोंड देत सगळे निघालेयत अंतिम ध्येयाच्या दिशेने. काय आहेत त्यांची स्वप्नं ? आणि काय आहेत त्यांची आव्हाने? याची गोष्ट बघायला मिळणार आहे ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मध्ये.

मराठी मालिकांच्या विश्वात कायम काही तरी नवीन आणि दर्जेदार कथा देणा-या झी मराठी वाहिनीवरून ही ‘फ्रेश’ विषयावरची मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. विषयासोबतच यात नाविन्य आहे ते यातील कलाकारांचं. यातील सहाही व्यक्तिरेखांसाठी अतिशय फ्रेश चेह-यांची निवड करण्यात आली आहे. अमेय वाघ, सुव्रत जोशी, पुष्कर चिरपुटकर, सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि स्वानंदी टिकेकर अशी नव्या दमाची कलाकार मंडळी या मालिकेत बघायला मिळणार आहे. मराठीमध्ये अनेक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन आणि छायांकन करणारे संजय जाधव यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. तर ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेचे दिग्दर्शन करणारे विनोद लव्हेकर यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. संजय जाधव आणि आशिष पाथरे यांची कथा आहे तर आशिषच्या सोबतीने मनस्विनी लता रविंद्र यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.

आजच्या तरूणाईची गोष्ट त्यांच्याच भाषेत मांडणारी ही मालिका युथफुल असली तरी ती सर्व प्रेक्षकांचा विचार करून बनवली आहे त्यामुळे ती सर्वांनाच आवडेल अशी झालीये. नात्यांच्या पलिकडची मैत्रीची ही गोष्ट ‘दिल दोस्ती दुनियादारी’ दाखल होतेय येत्या ९ मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. फक्त झी मराठीवर.

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी