LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
येक नंबर

येक नंबर

कथा बाह्यरेखा

चिराग पाटील 'येक नंबर' या मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकणार आहे. चिराग या मालिकेत रावडी मुलाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. प्रत्यक्षात मृदू स्वभावाचा असलेल्या चिरागला या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली, असं मालिकेचे दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी सांगितलं. त्यांनी गुरु पौर्णिमा आणि भारतीय या सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं. 

डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, खेळाडूचा मुलगा खेळाडू, अभिनेत्याचा मुलगा अभिनेता, असं चित्र अनेकदा पाहायला मिळतं. पण एका क्रिकेटरचा मुलगा आता क्रिकेटर न होता अभिनेता झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील आता छोट्या स्क्रीनवर नवी इनिंग सुरु करणार आहे.

चिराग पाटील 'येक नंबर' या मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकणार आहे. चिराग या मालिकेत रावडी मुलाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. प्रत्यक्षात मृदू स्वभावाचा असलेल्या चिरागला या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली, असं मालिकेचे दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी सांगितलं. त्यांनी गुरु पौर्णिमा आणि भारतीय या सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं. चिरागने यापूर्वी हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण मालिकेचा हा त्याचा पहिलाच अनुभव आहे. बॅट्समन संदीप पाटील यांचा मुलगा अभिनयात किती स्कोअर करतो ते आता बघूया.

22 जून रोजी स्टार प्रवाह या चॅनलवर ही मालिका सुरु होत आहे. अनेक तरुणांमधून चिरागची निवड करण्यात आली आहे.  'येक नंबर' ही एक लव्ह स्टोरी असून देवा आणि वेदा अशी मुख्य पात्रांची नावं आहेत. 

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी