LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
काहे दिया परदेस

काहे दिया परदेस

  • टीव्ही मालिका : काहे दिया परदेस
  • टीव्ही चॅनेल: झी मराठी
  • प्रारंभाची तारीख: २८ मार्च २०१६ पासून...
  • मालिकेची वेळ : सोमवार ते शनिवार रात्रौ ०९.००वाजता.
  • प्रस्तुती : महेश तागडे आणि जितेंद्र गुप्ता.
  • दिग्दर्शक: अजय मयेकर
  • भूमिका : सायली सजीव आणि ऋषी सक्सेना, मोहन जोशी आणि शुभांगी गोखले, निखील राऊत.

कथा बाह्यरेखा

‘काहे दिया परदेस’ ही मालिका मराठी आणि वाराणसी या दोन शहरातील संस्कृतींना एकत्र आणणारी आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या ‘झील’ समूहाच्या ब्रीदवाक्याशी जोडून घेणारे, हे विश्वची माझे घर असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. त्याचे प्रत्यंतर आज आपण समाजात पाहतो. मात्र, आता हा विचार या मालिकेच्या माध्यमातून मांडण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी मुलींनी गुजराती, उत्तरप्रदेशी किंवा दाक्षिणात्य मुलाशी विवाह करून संसार थाटणे ही गोष्ट तशी नवीन राहिलेली नाही. मात्र, आपल्या मनासारखा जोडीदार निवडताना प्रांत, भाषा, संस्कृती पलीकडे जात विचार करणारी तरुणी प्रत्यक्ष विवाह करून जेव्हा नव्या घरात जाते. तेव्हा दोन संस्कृतींचा हा मिलाफ साधताना नेमके काय होते? भिन्न जीवनशैली, विचारसरणी असलेली दोन्ही घरांची माणसे हळूहळू एकत्र येण्याची, एक होण्याची ही प्रक्रिया अनुभवण्याची संधी ‘झी मराठी’वरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेच्या निमित्ताने मिळणार आहे.

मुंबईत शिकण्याच्या-नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झालेला वाराणसीचा तरुण आणि त्याच्या प्रेमात पडून त्याच्याशी विवाह करणारी गौरी ही मराठी मुलगी यांची कथा ‘कोहे दिया परदेस’मधून पहायला मिळणार आहे.या मालिके निमित्ताने भाषा, सीमा, प्रांत यांच्या कक्षा ओलांडून जाणारी ही पहिली मालिका ठरणार आहे.‘काहे दिया परदेस’ मालिकेतून हर्ष सक्सेना आणि सायली संजीव ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येते आहे. सायली संजीव हिने याआधी ‘पोलीस लाइन’ चित्रपटातून काम केले असले तरी छोटय़ा पडद्यावरचे हे तिचे पहिले मोठे पदार्पण आहे.

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी