LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
नांदा सौख्य भरे

नांदा सौख्य भरे

  • टीव्ही मालिका : नांदा सौख्य भरे : सासूच्या खोटेपणावर सुनेच्या खरेपणाची मात
  • टीव्ही चॅनेल: झी मराठी
  • प्रारंभाची तारीख: २० जुलै २०१५
  • मालिकेची वेळ : संध्या. ७.३० वा.
  • प्रस्तुती : आदेश बांदेकर
  • भूमिका : सुहास परांजपे - सासू, ऋतुजा बागवे- सून, चिन्मय उदगीरकर - मुलगा

कथा बाह्यरेखा

स्वानंदी सत्याच्या आधाराने घरातील अनेक घटनांना सामोरं जाते. गोष्ट तेव्हा खूप मनोरंजक होते जेव्हा स्वानंदी आणि ललिता एकाच घरात एकत्र वावरतात आणि त्यांचे एकदम विरोधी विचार सामोरासमोर येतात.

स्वानंदीचं म्हणणं आहे "माणसं खरी असली, की नात्यात खोट येत नाही". 'नांदा सौख्य भरे' ही गोष्ट आहे स्वानंदीची, ती मनापासून खूप खरी आणि खोट्याचा तिरस्कार करणारी मुलगी आहे. स्वानंदीचा नवरा इंद्रनील हा अमेरिकेवरून परत आलेला असतो. ही कथा आहे स्वानंदी आणि तिची सासू, ललिताची.

आपल्याकडे प्रत्येक नात्यासोबत त्याचा स्वभावगुण सांगणारं एखादं विशेषण जोडलेलंच असतं.. जसं की आई मुलाचं नातं मायेचं, नवरा बायकोचं नातं प्रेमाचं, भाऊ बहिणीचं नातं जिव्हाळ्याचं आणि सासू सुनेचं नातं ? या नात्याला कोणतं विशेषण लावता येईल ? प्रेमाचं नातं की दुस्वासाचं ? सोबतीचं की कुरघोडीचं ? सासू सुनेच्या नात्याला मुळातच एक वादाची किनार असते ती कधी पुसटशी असते तर कधी अधिक गडद किंबहुना ती किनारच या नात्यामध्ये खरी गंमत आणते. अशीच एक सासू सुनेची जोडी आहे ललिता आणि स्वानंदीची.

दोघीही परस्परभिन्न स्वभावाच्या. ललिताची प्रत्येक गोष्ट दांभिकतेवर आधारलेली तर खरेपणा हा स्वानंदीचा पाया. बडेजाव हा ललिताचा स्वभाव तर साधेपणा हे स्वानंदीचं वैशिष्ट्य. अशा या दोन विरूद्ध टोकाच्या बायका एकाच घरात एकत्र येतात तेव्हा त्या घरात घडणा-या घटना या तेवढ्याच रंजक असतील. थोडक्यात सांगायचं तर, यातली सून ही सासूबाईंच्या डोक्यावर मि-या वाटणार नाही, तर सासूबाईंना नव्या जमान्यासोबत मिक्सरमध्ये मि-या कशा वाटता येतील ते शिकवेल. सासू-सुनेचं सकारात्मक नातं, त्यांच्या नात्यातला ओलावा जपण्याचा प्रयत्न.

या सासू सुनेची आणि घराची गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ‘नांदा सौख्य भरे’ या झी मराठीवरील आगामी मालिकेतून. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम एन्टरटेनमेंटची निर्मिती असलेली ही मालिका येत्या २० जुलैपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वा.

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी