किल्ले बाळापुर

किल्ले बाळापुर

0.0/5 मूल्यांकन (0 मते)

बाळापुर तालुक्याचें मुख्य ठिकाण असून मान नदी आणि म्हाईनदी यांच्या संगमावर असून पारस रेल्वस्टेशनच्या नैॠत्येस ६ मैलांवर आहे. संगमाजवळ एक बाळा देवीचें देऊळ आहे, त्यावरून गांवास बाळापुर हें नांव पडलें आहे. एने-ई-अकबरीमध्यें व-हाडच्या सुभ्यामध्यें बाळापुर हा अतिशय श्रीमंत परगणा आहे असा उल्लेख आहे. इलिचपूरनंतर मोंगलांच्या अमलाखालीं हेंच मुख्य लष्करी ठिकाण होतें.

बाळापुरचा हल्लीचा किल्ला १७५७ साली इलिचपूरचा पहिला नबाब इस्माइलखान यानें पुरा केला, असा शिलालेख बाहेरील दरवाजावर आहे. येथें ब-याच प्राचीन मशिदी पहावयास सांपडतात. लोकसंख्या दहा हजार असून निम्मे लोक मुसुलमान आहेत. सत्रंज्या, पागोटी व इतर कापड याबद्दल अद्याप बाळापूर प्रसिध्द आहे. अकोला जाताना खामगाव सोडल्यावर किंवा अकोल्यावरून येताना एस टी बाळापूरला थांबते तेव्हा आपल्या दृष्टीस हा गड पडतो.  मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्याशा उंचवट्यावर बाळापूर येथे हा प्रसिद्ध किल्ला बांधलेला आहे. बाळापूर किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी असून या तटबंदीला जागोजाग बलदंड बुरूज बांधून संरक्षणाची पुरेशी सिद्धता केली आहे.

बाळापूर किल्ल्याचा प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे दिसतात पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये असून या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करून आहे. हे लाकडी दरवाजे अजूनही इथे पहायला मिळतात. दारावरच्या कमानीवर महिरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख असा तिसरा दरवाजा आहे. यालाही महिरप केलेली आहे. या तिसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो. आतल्या इमारती जुन्या असून त्यांची जुजबी दुरुस्ती करून त्यामध्ये सध्या काही सरकारी कार्यालये केलेली आहेत. तटबंदीवर चढण्यासाठी जागोजाग पायऱ्या केलेल्या दिसतात. या पायऱ्यांवरून चढून प्रशस्त रुंदीच्या तटावर पोहोचता येते. तटावरून किल्ल्याला फेरी मारता येते. या तटबंदीवरून बाहेरील तटबंदीचेही दर्शन होते. बलदंड बुरुजांनी वेढलेली तटबंदी किल्ल्याच्या बेलागपणाची जाणीव करून देते.

बाळापूर गावाच्या दक्षिणेकडे नदीकाठावर मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री आहे. बाळापूरच्या किल्ल्याच्या भ्रमंतीमध्ये ही छत्रीही आवर्जून पहावी अशीच आहे आजूबाजूच्या सपाट प्रदेशामुळे तसेच लहानश्या उंचवट्यावर बांधलेल्या किल्ल्यामुळे दूरपर्यंतच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे सोपे जाते. पावसाळ्यात किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी नद्यांच्या पाण्याचा विळखा पडतो. २००० साली नद्यांना आलेल्या महापुरात तटबंदीचा काही भाग ढासळला आहे.

आपला सहभाग:

फेसबुक

सप्तरंग अंतरंग

 • इजिप्त पिरॅमिड मंगळावरही +

 • काही विचार : नाना पाटेकर +

 • यशाचा राजमार्ग : विलास मुणगेकर +

 • ललना लावण्यखणी... +

 • त-हेवाईक कोर्ट +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-१) +

 • यश तुमच्या हातात : शिव खेरा +

 • भन्नाट कातळशिल्प +

 • मजल..दरमजल..डॉ.किरण बेदी +

 • कुणा एकाची भ्रमण गाथा : गो.नी.दांडेकर +

 • विचारविलसिते : वि.द.घाटे +

 • जीवेत शरद: शतम +

 • पाऊस +

 • रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकर +

 • संदर्भासहित स्पष्टीकरण : सुमेध वडावाला रिसबूड +

 • चिमणी चिमणी दाणा दे +

 • अपेक्षा +

 • सिंहगड किल्ला +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-3) +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-5) +

 • 1
 • 2