Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
१) आपलं नाव? आपण मुळचे कुठले? आणि आता कुठे राहता?
* मी संध्या पवार. मूळ - महाराष्ट्र, सध्या गोवा
२) आपला व्यवसाय कोणता? * नोकरी
३) आपण कविता कधी पासून करायला लागलात? * वर्षभरापासून.
४) आपल्या कवितांबद्दल काही सांगा. आपल्या कविता मुख्यत्वे कोणत्या विषयाचं प्रतिनिधित्व करते ?
* भाव भावना, माझी कविता या बद्दल प्रामुख्याने लिहायला आवडतं
५) आपले आवडते कवि ?
* इंदिरा संत, शांता शेळके, वसंत बापट, बा. भ. बोरकर, ग्रेस, आरती प्रभू, सुधीर मोघे.. यादी मोठी आहे.
६) आपल्या कवितांवर कोणत्या कवीचा अधिक प्रभाव आहे असे तुम्हाला वाटते? का?
* कुणाचाही प्रभाव नाही असं वाटतं. असलाच तर कविवर्य (कै) सुरेश भट यांचा असेल. त्यांचा बंडखोर स्वभाव आवडतो.
७) आपल्या बद्दल सविस्तर माहिती :
* स्वत:बद्दल बोलावं असं विशेष काहीच नाही.
८) आपणांस आवडणारी एखादी स्वतःची कविता :
* त्या रात्री तू पाऊस होता / नाव चालते
९) आपण जसं लिहिता तसं जगायला आवडतं का?
* हो नक्कीच आवडेल.
१०) जोपर्यंत तुम्हांला सुचत नाही तोपर्यंत तुम्ही लिहित नाही की आवर्जून लिहिण्यावर तुमचा विश्वास आहे?
* आवर्जून लिहीण्यावर माझा विश्वास नाही. छानसे सुचण्याची वाट पाहून मग लिहायला आवडतं. पण अर्थातच वेळ काढून लिहायला बसल्याशिवाय ती दारावर टकटक करीत नाही हे ही सत्य आहे.
११) जी कविता लिहितो ती आवडतेच असं नाही पण काही कविता लिहू म्हणजे एखादी कदाचित चांगली होईल असं कधी झालं का ?
* कवितेची आराधना केल्याशिवाय ती सुचत नाही. याबाबतीत मी खूप भाग्यवान आहे. कामं संपल्यानंतर कवितेला साद दिली कि ती येते. चालीसहीत आणि भावासहित येते. काही वेळेला मात्र असं होतं कि पुढे आपण काय लिहीणार आहोत हे माहीत नसतं आणि काय लिहीलं ते पूर्ण झाल्यावरच समजतं. नाव चालते या कवितेबाबत असं म्हणता येईल.
१२) कविता लिहून झाल्यावर त्यात अपुरेपणा जाणवला किंवा कुणी बदल सुचवल्यास तुम्ही तो बदल करता का?
* बदल चांगला असेल तर स्विकारायला काहिच अडचण नसते.
१३) कवि असल्याने वेगवेगळे टप्पे जाणवतात का?
* नाही.
१४) चांगलं सुचण्यासाठी जाणूनबुजून काही प्रयत्न केले की ही दैवी देणगी म्हणावी?
* दैवी देणगी आहे.
१५) जुन्या कवींपैकी कोण कोण आवडतं?
* सुरेश भट
१६) लेखकांमध्ये आवर्जून उल्लेख करावा असे कोण आवडतात?
* भालचंद्र नेमाडे, रणजित देसाई, वि वा शिरवाडकर, शिवाजी सावंत, विश्वास पाटील इ.
१७) सध्या जे कवितालेखन करत आहात ते काही विशिष्ट वर्ग डोळ्यासमोर ठेवून आहे का?
* नाही. स्वत:ला आवडेल तेच लिहायला आवडतं.
१९ ) काही विशिष्ट कविता ज्यात लोकांचे प्रतिसाद चागले येतात, त्यामुळे मला जे सांगायचं आहे, माझी जी अभिव्यक्ती आहे ती मागेच राहते, असं कधी होतं का?
* अजून जाणवल नाही.
२०) असं कधी झालं तर त्याचा काही ताण येतो का?
* असं झालं तर कदाचित वाईट वाटेल. सध्या तरी सांगता येत नाही.
२१) तरीही एखादी कविता स्वतःला खूप आवडते पण ती लोकांना आवडणार नाही अश्या जाणिवेतून ती लोकांसमोर सादर करायची राहून गेली असं कधी झालंय का?
* नाही.
२२) मराठी विश्व विषयी काही ऐकलं आहे का? संकेतस्थळ पाहिलं आहे का?
* हो हे संकेतस्थळ खूप चांगलं आहे माझ्या काही कविता / गझल्स त्यावर प्रकाशित झालेल्या आहेत.
२३) घरी वातावरण वाचन/लेखनाला पोषक होतं का? आहे का?
* लहानपणी होतं. आता कामाचा ताण आहे. खूप कमी वेळ मिळतो.
२४) उत्तम कवितेचे तुमचे निकष काय आहेत?
* जी वाचल्यानंतर मनावर रेंगाळत राहते.
२५) "काव्यांजलीचा अनुभव कसा वाटला? त्यातून खरंच काही शिकायला, निदान विचार करायला मिळालं असं वाटलं का? आपल्या लिखाणातली बलस्थानं आणि त्रुटी लक्षात यायला काव्यांजली मुळे मदत झाली का?
* ही कम्युनिटी दर्जेदार कम्युनिटी आहे. खूप छान वाटतं इथं कविता सादर करायला. एखादी मैफल जमलेली असावी आणि तिचे आपण एक सदस्य आहोत असं वाटतं.
२६) काव्यांजलीतील आपल्या कवितांवरील प्रतिक्रिया खरंच काही प्रोत्साहन देतात का? * खरं सांगायचं तर धाडसी प्रतिक्रिया हव्यात असं वाटतं.
मुलाखत:- अशोक कृष्ण
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.