LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

कलाकार

मराठी अभिनेता, अभिनेत्री, संगीत, कला आणि अन्य क्षेत्रातील मंडळींची जीवन मालिका
अनिरुध्द हरिप

अनिरुध्द हरिप

 • जन्म तिथी: 18 June 1977
 • जन्म स्थान: पुणे

लक्ष्य, सौ. शशी देवधर, अब तक छप्पन असे अनेक चित्रपट आणि मालिकांन मध्ये झळकणारा हा अ‍ॅक्टर आहे अनिरूध्द हरिप. अनिरुध्द मुळचा पुण्याचा दिसायला गोरापान, उंच कोणत्याही हिरोच्या रोल साठी शोभावा असा पण मुळातच त्याला लिड रोल करण्यापेक्षा विलनचे रोल करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. अनिरुध्दला स्वत:ला ही विलनचे कॅरेक्टर करायला आवडतात.

प्रियदर्शनची फिल्म कमाल धमाल मालामाल मध्ये परेश रावलच्या मुलाचा म्हणजे विलन च्या भूमिकेत आहे. वर्षभरात तीन हिंदी चित्रपटात काम केल्यावर त्याला स्वत: हि विलनच्या रुपात पाहण आवडत आहे. अनिरुध्दला अस वाटत की त्याचा ड्रिमरोल तेव्हाच यशस्वी होईल ज्याप्रकारे पूर्वीच्या काळी लोक सिनेमागृहात येऊन चित्रपट पाहताच विलनचा राग मनात ठेऊन जात त्याच प्रकारे त्याचा रोल पाहुन ही त्याच्या बद्दलचा राग व्देष व्यक्त करतील.

चॉकलेट हिरोचा रोल मिळावा म्हणून प्रत्येकाच स्वप्न असत पण याचा पहिला प्रेफरंन्स निगेटिव्ह कॅरेक्टर ला आहे. अनिरुध्दने थायलंड ला थाई बॉक्सिंग शिकला आहे. त्यामुळे त्याला स्टंट्स करण फार आवडत. आता ‘बायकर्स अड्डा’ ‘महागणपती’ आणि अब तक छ्प्पन २ या प्रकारचे आणखीन एक दोन प्रोजेक्टवर वर सध्या तो काम करतोय. त्याला स्वत:ला ड्रायव्हिंग. रायफल शुटिंग, किक बॉक्सिंग आवडत त्याने स्वत: कमांडो ट्रेनिंग ही घेतले आहे. तो स्वत: एक मॉडेल असून तो एक चांगला कोरियोग्राफर पण आहे.

चित्रपट :- 

 • टेरर अ‍ॅटक ऑफ २६/११
 • कमाल धमाल मालामाल
 • उद्य
 • सिक्सर
 • पावडर
 • वासुदेव बळवंत फडके
 • अब तक छप्पन 
 • चिवित्रच सारे
 • शटर

मालिका :- 

 • वृंदावन
 • लक्ष्य
 • अधुरी एक कहाणी
 • ह्या गोजिरवाण्या घरात

 

 

संबंधित कलाप

शटर

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

 • कारखानीसांची वारी

  कारखानीसांची वारी

 • बळी

  बळी