Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
एकाच सिनेमात बाप आणि लेक, किंवा माय लेक दोघांनी एकत्रित काम करणं हा सध्या सिनेमाचा नवा ट्रेंड आहे. हाच ट्रेंड ढिनच्यॅक एंटरप्राइज सिनेमानेही फोलो केलेला आहे. मार्केटिंग च्या दृष्टिकोनातून सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या सिनेमात आपल्याला मीना नाईक आणि मनवा नाईक या दोघी माय लेकी पाहायला मिळणार आहेत. प्रेमाची परिभाषा प्रत्येकासाठी वेगळी असते आणि त्यामुळेच कि काय प्रेमाला एका ठराविक व्याख्येत बांधता येत नाही. अशीच प्रेमाची अनोखी परिभाषा ढिनच्यॅक एंटरप्राइज हा सिनेमा घेऊन येतोय. निशांत सपकाळे दिग्दर्शित या सिनेमात मनवा नाईक आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आजकाल सगळ्याचं नात्याची समीकरणं बदलत चालल्याने नेमकं विश्वासाचं आणि हक्काचं नातं कोणतं याचा थांगपत्ता कित्येकांना शेवटपर्यंत लागत नाही. मात्र या सगळ्यांत माणुसकीच्या नात्याला आजही तितकच पवित्र मानल जात. याचं माणुसकीच्या नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा २१ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मीना नाईक आणि मनवा नाईक या मायलेकीही पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र अभिनय करताना दिसणार आहेत.
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.