LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
खरीखुरी

खरीखुरी "फोटोकाॅपी"

चित्रपट हे माध्यम अनेक कलाकार वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात. काही सामाजिक तर काही विनोदी, काही थरारक तर काही प्रेमकथा सांगणारे.पण अश्यावेळी जेव्हा एक प्रेमकथा जुळ्या बहिणींची असेल तर त्यात किती गंमंत येईल. अशीच एक अगदी यूथफुल कथा जी प्रेक्षकांना निखळ आनंद देऊन जाईल तुमच्या भेटीला नेहा राजपाल प्रोडक्शनच घेऊन येत आहे. चित्रपटाचं शिर्षक काय असेल ह्याची उत्सुकता लोकांमघे शूटींच्या पहिल्या दिवसापासून होती आणि फायनली "फोटोकाॅपी" शिर्षक एका फर्स्ट लूक पोस्टरद्वारे जाहिर झाला.

व्हॉट्सअॅप टॅलेंट हंटच्या माध्यमातून घेतलेल्या ऑडीश्नसमधून हीरो मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला आहे. चेतन चिटणीस या नवोदित कलाकारांना सिनेमात पाहता येणार आहे. ९ x झकास आणि रेडियो सिटी यांनी एकत्रित घेतलेल्या टॅलेंट हंट कॅम्पिटीशनमधील २० हजार स्पर्धकांमधून या दोघांची निवड झाली आहे. तर डबलरोल मध्ये दिसणार आहे नाट्य सृष्टीतलं आजच्या पिढीतलं आधाडीचं नाव, पर्ण पेठे. अशा अगदी हटके फ्रेश जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सिनेमातील जुळ्या बहिणींच्या गोड आजीची भूमिका वंदना गुप्ते यांनी केली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन विजय मौरया यांनी केलं असून कथा ओमकार मंगेश दत्त आणि डॉ. आकाश राजपाल यांची आहे. सिनेमाची पटकथा आणि संवाद विजय मोरया आणि योगेश जोशी यांनी लिहिले आहेत. कास्टिंग डिरेक्टरची जबाबदारी रोहन म्हापुसकर यांनी संभाळली आहे. सिनेमाचे चित्रीकरण पुणे आणि लावासा येथील अतिशय सुंदर आणि नयनरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आलं आहे. या सिनेमाचे संकलन निनाद खानोलकर यांनी केले आहे. तनू वेड्स मनू रिटर्न या सिनेमात त्यांच्या कामाची जादू आपण पहिलीच. ६ गाणी आणि ६ संगीत दिग्दर्शक असेलल्या आणि मनोरंजनाने भरलेल्या या सिनेमात फॅशन बिग बाजार पार्टनर आहेत. हा सिनेमा २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे .

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

  • कारखानीसांची वारी

    कारखानीसांची वारी

  • बळी

    बळी