LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
बिन कामाचे संवाद

बिन कामाचे संवाद

बिन कामाचे संवाद : अर्थपूर्ण बकवास

धर्मकीर्ती सुमंत या नाटककाराच्या नाटकातून हाती लागणारं हे सूत्र. त्याच्या अवती भोवती निरर्थक संवादांची आणि प्रतिमांची भेंडोळी पडली आहेत. ती उचलून पझल सारखी एकमेकांना जोडून त्यातून सलग चित्र निर्माण करण्यातही काही अर्थ नाही.

धर्मकीर्ती सुमंत या नाटककाराच्या नाटकातून हाती लागणारं हे सूत्र. त्याच्या अवती भोवती निरर्थक संवादांची आणि प्रतिमांची भेंडोळी पडली आहेत. ती उचलून पझल सारखी एकमेकांना जोडून त्यातून सलग चित्र निर्माण करण्यातही काही अर्थ नाही. कारण आजच्या शतखंडित वास्तवाचेच ते असंख्य तुकडे आहेत. या शतखंडित वास्तवाला सामोरा जाणाऱ्या माणसाचेही असंख्य तुकडे झाले आहेत. टेक्नॉलॉजीने अत्यंत क्षुद्र करून टाकलेल्या मानवप्राण्याची ही एक विचित्र शोकांतिका आहे, जिच्यात कोणताही शोकात्म भाव नाही. उलट एक जंगी सेलिब्रेशन आहे आणि त्यात सर्वांना मजा येतेय. किंबहुना सर्व जण तसं म्हणत तरी आहेत आणि आपल्या आत निर्माण झालेल्या पोकळीचा अभाव हसण्यात, जोक्स सांगण्यात, कोट्स देण्यात, कमेंट्स शेअर आणि लाइक करण्यात, एकमेकांना गिफ्टस् देण्यात भरून काढण्याचा प्रयत्न करताहेत. 

आलोक राजवाडे या दिग्दर्शकाने अतिशय निष्णात नटसंचाच्या सहाय्याने उभा केलेला प्रयोग देखणा आहे. त्याच्या रूपाचा विचार हा त्याच्या प्रकाश, ध्वनी, संगीतादी गोष्टींतून समग्रपणे केलेला जाणवतो. नाटक सुरू होण्यापूर्वी रंगमंचावर बसलेल्या प्रत्येकाच्या हातात असलल रंगीत गोल हा प्रत्येकाच्या भ्रामकविश्वाचं निदर्शक आहे. पात्रांची संवादभाषा रिअॅलिटी शो प्रमाणे कृत्रिम, वरवरची आणि आकर्षक आहे. त्यांच्या देहबोलीत एक आविर्भाव आहे आणि या सगळ्याचा एकमेकांशी ताळमेळ नाही. अशा कोणतीही हार्मनी नसलेल्या पात्रांच्या नाटकाचं ऑर्केस्ट्रेशन आलोकने सुरेख केलं आहे. त्याने रंगमंचावकाशात एक सुनियंत्रित गोंधळ उत्तमपणे साकारत ही अर्थपूर्ण बकवास साजरी केली आहे. यातल्या प्रत्येक कलाकाराचा अभिनयाचा दर्जा आणि क्षमता वरची आहे, एवढं सांगितलं तरी पुरे. कारण हॅपनिंगच्या पातळीवर जाणारा हा अनुभव कलाकारांच्या अदाकारीनेच उंचीवर जातो. तरीही त्यात भोसंका साकारणाऱ्या अभय महाजनला हॅटस् ऑफ!

 • निर्माता : नाटक कंपनी, पुणे
 • दिग्दर्शक : आलोक राजवाडे
 • लेखक: धर्मकीर्ती सुमंत
 • नृत्य दिग्दर्शन: पर्ण पेठे
 • प्रकाश योजना: अनिकेत काळे
 • नेपथ्य: रवी चौधरी, सुनीत वडके
 • संगीत : साकेत कानेटकर
 • भूमिका : अभय महाजन, वीरा सक्सेना, ओंकार गोवर्धन, सुव्रत जोशी, धनराज नारायणकर, पुष्कराज चिरपुटकर, लक्ष्मी बिराजदार, सिद्धेश पूरकर, अक्षया देवधर, तुषार टेंगले.

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

 • कारखानीसांची वारी

  कारखानीसांची वारी

 • बळी

  बळी