Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
झोपाळा हे नाटक मराठी साहित्याचे सुप्रसिध्द लेखक व.पु.काळे आणि रत्नाकर मतकरी यांच्या दोन भिन्न कथांवर आधारित आहे. ‘झोपाळा’ नावाचं हे प्रायोगिक म्हणजे व. पु. काळे आणि रत्नाकर मतकरी या मराठीतल्या दोन प्रथितयश लेखकांच्या त्याच नावाच्या दोन कथांचं नाटयरूप आहे.
झोपाळा हे नाटक मराठी साहित्याचे सुप्रसिध्द लेखक व.पु.काळे आणि रत्नाकर मतकरी यांच्या दोन भिन्न कथांवर आधारित आहे. ‘झोपाळा’ नावाचं हे प्रायोगिक म्हणजे व. पु. काळे आणि रत्नाकर मतकरी या मराठीतल्या दोन प्रथितयश लेखकांच्या त्याच नावाच्या दोन कथांचं नाटयरूप आहे. कुणाल आलवे, पराग ओझा, सुशील जाधव या तीन विद्यार्थी दिग्दर्शकांनी ते दिग्दर्शित केलंय. त्यांनीच त्याचं नाटयरूपांतरही केलं आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या नाटकाला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. आजवर झालेले या नाटकाचे सातही प्रयोग हाऊसफुल्ल गेलेत. समीक्षकांकडूनही नाटकाला चांगले गुण मिळतायत. ज्यांच्या कथेवर या नाटकाचा एक अंक आहे, त्या रत्नाकर मतकरींनी या तरुण रंगकर्मीचं कौतुक केलंय.
कुणाल-पराग-सुशील यांनी पहिल्याच नाटकांसाठी वपु आणि मतकरी यांच्या दोन कथांची केलेली निवड अनेकांना चकित करणारीच होती. मुळात दोन्ही लेखकांच्या लिखाणाची जातकुळी वेगळी. वपु हलकफुलकं लिहिणारे तर मतकरी गूढगंभीर लिहिणारे. त्यामुळे या दोन लेखकांच्या भिन्न जातकुळीतील कथांना नाटयरूपात गुफणं हीदेखील एक मोठी गोष्ट होती.
या दोन कथा नाटकातही स्वतंत्रपणे सादर होतात. पहिल्या अंकात वपुंची कथा सादर होते. ती ५५ मिनिटांची आहे, तर दुस-या अंकात सादर होणारी मतकरींची कथा ३५ मिनिटांची आहे. या कथा स्वतंत्रपणे सादर होत असल्याने दोन ज्यॉनरचं मिश्रण होत नाही. मात्र झोपाळा ही सामायिक गोष्ट दोन्ही नाटकांच्या केंद्रस्थानी आहे.
विशेष म्हणजे कुणाल-पराग-सुशील या तिघांची कामाची शैली वेगळे आहेत. सुशील अभिनेता आहे आणि त्याला लेखनाचीही आवड आहे. कुणाल डबिंग आर्टिस्ट आणि कलाकारीत रस असणारा आहे. पराग हा व्यावसायिक लेखक आहे. त्याने काही कार्टून सीरिज लिहिल्यात. तो ‘यलो’ चित्रपटाच्या रिसर्च टीममध्येही होता.
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.