Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
मराठी सिनेमांमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात असताना त्यातही एक वेगळा प्रयोग एका सिनेमासाठी करण्यात आला आहे. ‘बायोस्कोप’ या सिनेमासाठी मराठीतील तब्बल चार दिग्दर्शक एकत्र आले आहेत. फक्त चार दिग्दर्शक नाहीतर या कवीही या सिनेमासाठी एकत्र आले असून या चार कवींच्या कवितांवर या सिनेमात चार कथा दाखवण्यात आल्या आहेत. हा सिनेमा येत्या १७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ब-याच कालावधीपासून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत असलेल्या सिनेमाची प्रेक्षकही आतुरतेने वाट बघत आहेत.
अभय शेवडे.
१) मित्रा - रवि जाधव, २) बैल - गिरीश मोहिते, ३) एक होता काऊ - विजू माने, ४) दिल-ए-नादान - गजेंद्र अहिरे.
१) मित्रा - विजय तेंदुलकर, २) बैल - अभय दखने, ३) एक होता काऊ - विजू माने, ४) दिल-ए-नादान - गजेंद्र अहिरे.
१) मित्रा - रवि जाधव ,२) बैल - गिरीश मोहिते आणि अभय दखने, ३) एक होता काऊ - विजू माने, सतीश लाटकर, ४) दिल ए नादान - गजेंद्र अहिरे.
१) मित्रा - संदीप खरे, २) बैल - लोकनाथ यशवंत, ३) एक होता काऊ - किशोर कदम, ४) दिल-ए-नादान - मिर्झा गालिब.
१) मित्रा - सलील कुळकर्णी, २) बैल - अविनाश – विश्वजित, ३) एक होता काऊ - सोनम पाठक, ४) दिल ए नादान - नरेंद्र भिडे.
१) मित्रा - वीणा जामकर, मृण्मयी देशपांडे. २) बैल - मंगेश देसाई, स्मिता तांबे, उदय सबनीस, सागर कारंडे. ३) एक होता काऊ - कुशल बद्रिके, स्पृहा जोशी. ४) दिल-ए-नादान - नीना कुळकर्णी, सुहास भालेकर.
रवी जाधव, गजेंद्र अहिरे, विजू माने आणि गिरीश मोहिते हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील चार प्रतिभावंत आणि वेगळ्या पठडीतले सिनेमे करण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक या सिनेमासाठी एकत्र आले आहेत. ‘बायोस्कोप’ या सिनेमात चार वेगवेगळ्या कथा रेखाटण्यात आल्या आहेत. उर्दू कवी व शायर मिर्झा गालिब यांच्यासह मराठीतील लोकनाथ यशवंत, किशोर कदम व संदीप खरे या तीन नामवंत कवींच्या कवितांवर तो बेतला आहे.
‘बायोस्कोप’ या सिनेमाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे या सिनेमासाठी फक्त चार दिग्दर्शक आणि चार कवीच एकत्र आलेले नाहीयेत तर चार संगीतकार सुद्धा या सिनेमाला लाभले आहेत. अविनाश विश्वजीत, डॉ.सलील कुलकर्णी, नरेंद्र भिडे आणि चिनार-महेश या चार संगीतकारांनी सिनेमाला संगीत दिले आहे. अनेक फिल्म फेस्टीव्हलमध्ये या सिनेमातील रवी जाधव यांची शॉर्टफिल्म ‘मित्रा’ खूप गाजली आहे. आता प्रेक्षकांची या सिनेमाची उत्सुकता कमी होणार आहे.
शिवाय “बायोस्कोप” मध्ये नीना कुलकर्णी, सुहास पळशीकर, मृण्मयी देशपांडे, वीणा जामकर, मंगेश देसाई, स्मिता तांबे, कुशल बद्रिके, स्पृहा जोशी अशा एकापेक्षा एक सरस अभिनेत्यांचा अभिनय यात पाहायला मिळणार आहे. संदीप खरे हा कवी आता अभिनेत्याच्या भूमिकेतून मराठी चित्रपटक्षेत्रात पदार्पण करतोय. आता या सिनेमाची उत्सुकता चांगलीच ताणली गेली आहे.
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.