LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
मनातल्या उन्हात

मनातल्या उन्हात

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट

प्रस्तावना

"मनातल्या उन्हात" या सिनेमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय पारितोषिक विजेते अभिनेते किशोर कदम, अभिनेत्री मिताली जगताप आणि बालकलाकार हंसराज जगताप या सिनेमात एकत्र आले असून रंगभूमीवर गाजत असलेल्या "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहोल्ला" या नाटकातून आपल्याला अभिनयाचा ठसा उमटविणारा कैलास वाघमारे मुख्य भूमिकेतून या सिनेमात आपल्या भेटीस येणार आहे. तसेच अभिनेते नागेश भोसले, समीर धर्माधिकारी अभिनेत्री रुचिता जाधव, छाया कदम आणि बालकलाकार मंथन पाटील, ओविशिखा पाटील यांचा उत्तम अभिनय ही आपल्याला या सिनेमात पहायला मिळणार आहे. सिनेमाची कथा संजय पाटील यांची असून पटकथा विद्यासागर अध्यापक, पांडुरंग के. जाधव यांनी एकत्रितपणे लिहिली आहे तर संवाद विद्यासागर अध्यापक यांचे आहेत.

नागराज दिवाकर यांनी या सिनेमाचे उत्तम छायांकन केले असून निलेश नवनाथ गावंड यांनी या सिनेमाचे संकलन केले आहे. विश्वराज जोशी यांनी लिहिलेल्या गाण्याला राहुल मिश्रा यांचे सुमधुर संगीत लाभले असून सिनेमातील गाणी सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि गायिका रंजना जाधव- माने यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत तर पार्श्वसंगीत अश्विन श्रीनिवासन यांचे लाभले आहे.

  • प्रस्तुती तिथी: 24 July 2015
  • निर्माता: विजयश्री पाटील ( आनंदसागर प्रोडक्शनस)
  • दिग्दर्शक: पांडुरंग जाधव.
  • पटकथा: विद्यासागर अध्यापक आणि पांडुरंग जाधव.
  • गीतकार: विश्वराज जोशी.
  • गायक/गायिका: आदर्श शिंदे आणि रंजना जाधव माने.
  • संगीत: राहुल मिश्रा, अश्विन श्रीनिवासन
  • भुमिका आणि पात्र:

    किशोर कदम, कैलास वाघमारे, समीर धर्माधिकारी, नागेश भोसले, रुचिता जाधव, छाया कदम, मिताली जगताप, हंसराज जगताप, मंथन पाटील आणि ओवेशिखा पाटील.

कथानक

कारगिल लढाईत भाग घेतलेले एअरफोर्समधील पायलट असलेले संजय पाटील या व्यक्तिमत्त्वाच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.

स्वप्न ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात पाहिलेली असतात. या स्वप्नांमध्ये प्रत्येकाला रमायला आवडते. आपण पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरीने प्रयत्नांची पराकाष्टा करत असतो. काही जणांची स्वप्न पूर्ण होतात तर काही जणांच्या पदरी निराशा येते. आजची पिढीला आपण भावी आयुष्यात पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांचा त्यांना खंबीरपणे पाठींबा असतो. 

आपली स्वप्न पूर्ण झाली नाहीत म्हणून आपले आई वडील खचून न जाता आपल्या मुलांच्या पदरी अशी वेळ येऊ नये यासाठी आज जीवाचे रान करून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी आजच्या या महागाईच्या जगात राबताना आपल्याला दिसतात. आज कालची मुलं ही आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या धावपळीत असतात त्यामुळे आपल्या आई वडिलांची काही स्वप्न होती का? त्यांनी पाहिलेली त्यांची स्वप्न पूर्ण झाली, की नाही झाली? जर नसतील झाली तर ती आपण ती पूर्ण करू शकतो का?

अशीच एक आगळी-वेगळी स्वप्नांची कथा असलेला "मनातल्या उन्हात" हा सिनेमा लवकरच आता आपल्या भेटीस येणार आहे.काहीशा वेगळ्या धाटणीच्या विषयावर भाष्य करणारा "मनातल्या उन्हात"

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक