Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
करिअरच्या संधीमुळे लग्नानंतर परदेशात गेलेला नवरा आणि भारतात असलेली बायको...त्यांचं 'लाँग डिस्टन्स रिलेशनशिप'....अंतरामुळे वाढलेला दुरावा आणि दुराव्यामुळं लागलेली प्रेमाची ओढ या सगळ्या भावनांचा पट आपल्याला या टीझरमध्ये पाहायला मिळतो. करिअरच्या निमित्तानं दूर राहणाऱ्या या जोडप्यांच्या नात्यात , कौटुंबिक बंधांत होत जाणारा बदल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे
समीर जोशी यांनी दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटाचे लेखनही केले आहे. मृण्मयी आणि सिद्धार्थसोबत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर हे कलाकारही चित्रपटात झळकणार आहेत. 'मिस यू मिस्टर' २८ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. .
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.