LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
नटसम्राट - २०१६

नटसम्राट - २०१६

वर्ष २०१६ चे चित्रपट , आगामी चित्रपट, मराठी चित्रपट, नटसम्राट' अवतरणार रुपेरी पडद्यावर

प्रस्तावना

मराठी रंगभूमीवर आपल्या कथाआशयाने अजरामर ठरलेले नटसम्राट हे नाटक आता मराठी चित्रपटाच्या रूपातही आपल्यासमोर येणार आहे. प्रदर्शनाच्या आधीच लोकांच्या उत्सुकतेचा विषय बनला आहे नाना पाटेकर निर्मित आणि अभिनीत ‘नटसम्राट’ हा चित्रपट. आता यातच हा चित्रपट १ जानेवारी २०१६ ला प्रदर्शित होतो आहे. खरेतर याच तारखेला आणखी एक मराठी चित्रपट प्रदर्शित होणार होता. नागराज मंजुळेची ‘फॅन्ड्री’नंतर दिग्दर्शक म्हणून नवी कलाकृती असलेल्या ‘सैराट’ची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली गेली. दिग्दर्शकाकडून चित्रपटावर अजून काम बाकी असल्याचे कारण देण्यात आले.

पण यामागचे खरे कारण हे ‘नटसम्राट’ समजले जाते आहे. झी स्टुडिओज म्हणजे पूर्वाश्रमीचे एस्सेल व्हिजनची ‘नटसम्राट’ हा चित्रपट प्रस्तुती आहे, तर ‘सैराट’ ची निर्मिती आणि प्रस्तुतीदेखील झी स्टुडिओजची आहे. दोनही कलाकृती एकाच बॅनरच्या असल्याने एकाच तारखेला हे दोन चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही यावर लांबलचक चर्चानंतर सहमती दर्शविली गेली आणि हा निर्णय घेतला गेला आहे.

वि. वा. शिरवाडकर यांच्या कादंबरीवर आधारित नटसम्राट हे नाटक आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. आणि आता पहिल्यांदा या गाजलेल्या साहित्यकृतीवर सिनेमा बनतोय. डॉ. श्रीराम लागू यांनी अजरामर केलेल्या नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका सिनेमामध्ये दस्तुरखुद्द नाना पाटेकर साकारत आहेत हे विशेष.

याबरोबरच जितेंद्र जोशी, नेहा पेंडसे, मेधा मांजरेकर आदी कलाकार सिनेमात पाहायला मिळणार. दरम्यान नटसम्राट हा सिनेमा समस्त मराठी सिनेसृष्टीसाठीही एक महत्त्वाचा सिनेमा मानला जात आहे.

  • प्रस्तुती तिथी: 01 January 2016
  • निर्माता: विश्वास जोशी आणि नाना पाटेकर (फिनक्राफ्ट मिडिया अॅण्ड एंटरटेनमेंट प्रा. लि., गजानन चित्र आणि आणि ग्रेट मराठा एंटरटेनमेंट)
  • दिग्दर्शक: महेश मांजरेकर.
  • कथा आणि पटकथा: हेमंत एदलाबादकर.
  • संगीत: अजित परब.
  • भुमिका आणि पात्र:

    नाना पाटेकर, मेधा  मांजरेकर, विक्रम गोखले, रीमा, सुनील बर्वे, नेहा पेंडसे आणि जितेंद्र जोशी.

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक