Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
रचला गेलाय फँड्री या सिनेमानंतर नागराजच्या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे आता नागराज 'सैराट'मधून प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत राहिला आहे. त्यातूनचं दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चित्रपटाचा टीजर आणि प्रोमो गाणे प्रदर्शित करून सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचवली आहे. सैराट चित्रपटातील ‘याडं लागलं ग याडं लागलं गं’ या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या गाण्यातून पहिल्यांदाच चित्रपटातील मुख्य कलाकारांचे चेहरे पाहावयास मिळत आहेत. नुकताच वयात आलेला नायक प्रेमात पडल्यामुळे त्याची अवस्था वेडावणारी आहे.
इतिहास रचला गेलाय मराठी चित्रसृष्टीचा. 'सैराट' ठरलाय हॅालिवूडमधील 'सोनी स्टूडियोज' मध्ये 'सिंफनी ओर्केस्ट्रा'सोबत ध्वनिमुद्रण करणारा पहिला भारतीय चित्रपट. सुवर्णाक्षरांत लिहील्या गेलेल्या ह्या इतिहासाचे सोनेरी क्षण, खास ...बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सिनेमाला भरभरुन दाद मिळाली.येत्या २९ एप्रिलला प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. 'सैराट' फक्त महाराष्ट्रातच प्रदर्शित होणार नसून, संपूर्ण देश-विदेशात प्रदर्शित होणार आहे. ...
रिंकू राजगुरू, आकाश ठोसर,नागराज मंजुळे, सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार, तानाजी गालगुंडे, अरबाझ शेख, छाया कदम, भूषण मंजुळे.
सैराट ही एक प्रेमकथा असून त्याची केंद्रबिंदू एक समर्पित तरुणी आहे.गाण्यांच्या प्रोमोवरून हा चित्रपट लव्हस्टोरी असेल हे आत्तापर्यंत बऱ्याचजणांच्या लक्षात आलं असेल, पण नागराज मंजुळे यांची असामान्य प्रतिभा बघता, ही लव्हस्टोरी सामान्य नक्कीच नसणार हेही तेवढंच खरं! फॅन्ड्री सारखीच संवेदनशीलता याही चित्रपटात असली तरी हा पूर्णपणे सामाजिक विषयावरचा चित्रपट नाही.
1) 66th Berlin International Film Festival 2) 63rd National Film Awards (Rinku Rajguru)
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.
Comments (11)
नितीन कराड
भेटू २९ एप्रिल २०१६ रोजी पहील्याच "शो" ला.......धन्यवाद
???????
reply
Prashant Ghawade
reply
ranjeet patil
reply
mahesh jagdale
reply
VIKAS
reply
omkar ghumbre
reply
लक्ष्मण पवार
reply
Shrikant Halve
reply
kimantu omble
नागराज मंजुळेच्या कोणत्याही चित्रपटातून जात कधी जात नाही, कारण नागराजच्याच मते आपल्याच समाजातून जात कधी जात नाही. रंग बदलून, कधी खुलून तर कधी लपून ती आपल्या भोवती असतेच. खरंच आहे, जात नाही ती जात म्हणतात ते का उगाच? इथे महाराष्ट्रात किती साधू संत घसा कोरडा पडून गेले आणि किती डोकं आपटून गेले तरी जात आहे तिथेच आहे. खरं तर या देशाच्या इतिहासात जी गोष्ट कधीच कोणत्याच काळात आजपर्यंत इतिहास जमा झाली नाही ती म्हणजे जात. वर्तमानकाळात पण या पुरोगामी महाराष्ट्रात जात पुसली जायच्या ऐवजी जास्त अधोरेखीत होते आहे.
संपूर्ण चित्रपट परिक्षण वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://kimantulive.wordpress.com/2016/05/04/सैराट-जात-नाही-ती-जात/
reply
संध्या पवार
https://www.facebook.com/notes/sandhya-pawar/सैराट-माझीही-एक-भर/976229572485169
reply
Befikir Befikeer
https://www.facebook.com/befikir.befikeer/posts/782879181811678
reply