LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
संदूक

संदूक

वर्ष २०१५ चे चित्रपट, मराठी चित्रपट

प्रस्तावना

गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपट आणि मालिकांच्या विश्वात रमलेल्या सुमित राघवनचे मराठी चित्रपटात पदार्पण झाले आहे. संदूक या चित्रपटाच्या माध्यमातून तो रसिक प्रेक्षकांसमोर येत आहे.

ओरँजेन एंटरटेनमेंट’चे विश्वजित गायकवाड आणि मंदार केणी यांची निर्मिती असलेल्या ‘संदूक’मधून सुमित प्रथमच नायकाच्या भूमिकेत झळकणार असून ‘बाळकडू’च्या यशानंतर पुन्हा एकदा अतुल काळे यांचे कुशल दिग्दर्शन या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. १९४० च्या दशकातील गोष्ट मांडणारा ‘संदूक’ हा ऐतिहासिक–विनोदी चित्रपट आहे. मराठीत गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट बनत असून त्याला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचा प्रतिसादही मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर संदूकच्या निमित्ताने प्रथमच ऐतिहासिक–विनोदी या आगळ्यावेगळ्या जॉनरचा चित्रपट बघायला मिळणार आहे. सुमित राघवन आणि भार्गवी चिरमुले या प्रमुख जोडीबरोबर शरद पोंक्षे, अरुण नलावडे, राहुल मेहेंदळे यांसारख्या कसलेल्या अभिनेत्यांची जुगलबंदी अनुभवता येणार आहे. ‘मातीच्या चुली’, ‘दे धक्का’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘तिचा बाप त्याच बाप’, ‘असा मी अशी ती’ आणि ‘बाळकडू’ यांसारख्या यशस्वी चित्रपटानंतर ‘संदूक’मधून प्रथमच गतकाळ उभा करणारा दिग्दर्शक अतुल काळे म्हणतो, “‘संदूक’ हे माझं बऱ्याच वर्षांपासूनचं स्वप्न आहे. शक्य असते तर माझा पहिला चित्रपट म्हणून ‘संदूक’च बनवणे मला आवडले असते.

माझे हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी १२ वर्षं लागली आहेत. त्यामुळे मी अर्थातच आनंदी आहे आणि आघाडीचे कलाकार आणि तंत्रज्ञांची साथ या स्वप्नाला लाभणे हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे. सुमितशी माझी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मैत्री असून ‘संदूक’साठी अन्य कोणत्याच नावाचा विचार करणे मला अशक्य होते.” यासंदर्भात सुमित म्हणतो, “‘संदूक’ माझ्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकतर हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे. दुसरे म्हणजे माझा बालपणापासूनचा मित्र अतुल काळे याच्या दिग्दर्शनात मला काम करायला मिळणार आहे. हा खूप भव्य, महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे.

इतक्या वर्षांची प्रतीक्षा फळाला आली, असे मी म्हणेन.” ‘संदूक’ची पटकथा अतुल काळे, आशीष रायकर आणि सुबोध खानोलकर यांनी लिहिली असून हृषिकेश जोशी याचे संवाद आहेत. छायालेखनाची जबाबदारी अजित रेड्डी यांनी पार पाडली असून कला दिग्दर्शन महेश कुडाळकर यांचे आहे. गुरू ठाकूरच्या गाण्यांना अजित-समीर या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलं असून वेशभूषा महेश शेर्ला यांची, तर अॅक्शन संकल्पना प्रद्युम्नकुमार यांची असणार आहे. येत्या ५ जूनला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 • प्रस्तुती तिथी: 05 June 2015
 • निर्माता: विश्वजित गायकवाड आणि मंदार केणी
 • दिग्दर्शक: अतुल काळे
 • कथा: अतुल काळे
 • पटकथा: आशिष रैकवार, अतुल काळे आणि सुबोध खानोलकर
 • गीतकार: गुरू ठाकूर, विध्याधर भावे आणि अशोक बागवे.
 • संगीत: अजित समीर
 • भुमिका आणि पात्र:
  • सुमित राघवन - वामनराव अष्टपुत्रे   
  • भार्गवी चिरमुले - रुक्मिणी अष्टपुतरे 
  • शरद पोंक्षे - शामराव 
  • अरुण नलावडे - दिनकरराव 
  • राहुल मेहंदळे - भातखंडे 
  • रमेश वाणी - मुरकुटे 
  • राहुल गोरे - राणा 
  • जे. ब्रान्डन हिल - स्कॉट
  • शंतनू गणगणे - बन्या
  • मंगेश सातपुते - देवेन 
  • सिद्धेश प्रभाकर - गणू
  • दिनेश मेडगे - भारत 
  • नंदकुमार पाटील - भारत 
  • अजित परब - तातू 
  • फिरदोस मेवावाला - बिलीमोरीया 

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक