LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
शोर्टकट

शोर्टकट

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट, शोर्टकट दिसतो पण नसतो.....

प्रस्तावना

मराठीत सध्या अनेक सिनेमे येऊ लागले आहेत. फक्त लव्हस्टोरी, अ‍ॅक्शन, विनोदी असेच सिनेमे नाही, तर तरूणाईला चुकीच्या मार्गावर घेऊन जाणाऱ्या विषयांवरही सिनेमे यायला लागले आहेत. असाच एक गंभीर गुन्हा असलेल्या आणि तरूणाईमध्ये वाढत जात असलेल्या 'सायबर क्राईम' सारख्या विषयावर भाष्य करणारा 'शॉर्टकट' हा अफलातून सिनेमा आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. मराठीत पहिल्यांदाच अशा तांत्रिक विषयावर सिनेमा करण्यात आला असून अत्यंत महत्वाचा असा हा विषय रोमँटिक-थ्रिलर पद्धतीने साकारण्यात आला आहे. तरूणाई अल्पावधीतच श्रीमंत होण्याच्या नादात 'शॉर्टकट'चा मार्ग अवलंबतात. पण हा शॉर्टकट त्यांना पुढे किती महागात पडतो, याचा उलगडा या सिनेमात होणार आहे. 

हरीश राऊत दिग्दर्शित आणि 'एम के मोशन पिक्चर्स'चे मुकेश चौधरी व चित्रकार फिल्म्सचे बी. आर. देढीया यांची निर्मिती असलेल्या 'शॉर्टकट' सिनेमासाठी प्रमोटर म्हणून GSEAMS कंपनीच्या अर्जुन सिंग बारन आणि कार्तिक निशाणदार यांनी काम पाहिले आहे. एखाद्या बॉलीवूड चित्रपटासारखे चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आल्याने हा सिनेमा अगदी चकाचक दिसतो. कॉम्प्युटर ग्राफिक्सचा वापरही दिग्दर्शक हरीश राऊत यांनी उत्तम पद्धतीने केला आहे या सिनेमातून मराठीतील तगडी स्टारकास्ट तुमचे मनोरंजन करणार असून अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही हॉट आणि रोमँटिक जोडी पहिल्यांदाच एकत्र या सिनेमात बघायला मिळणार आहे तर पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत अभिनेते राजेश श्रृंगारपुरे यांचा बहारदार अभिनय बघायला मिळणार आहे. संस्कृती आणि वैभव यांचा एक सुपर हॉट इन्टिमेट सीनही यात बघायला मिळणार असून या सीनची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

  • प्रस्तुती तिथी: 07 August 2015
  • निर्माता: मुकेश चौधरी आणि बी.आर. देढीया ( एम.के. मोशन पिक्चर्स आणि चित्रकार निर्मित )
  • दिग्दर्शक: हरीश रावूत
  • कथा: हरीश रावूत
  • पटकथा: हरीश रावूत, विनय नारायणे, राजेश बाळापुरे.
  • गीतकार: अभिषेक प्रदीप खाणकर.
  • संगीत: निलेश मोहरीर, प्रेमानंद, सुशांत-शंकर,पुनीत दिक्षित आणि निक.
  • भुमिका आणि पात्र:

    राजेश शिनगारापुरे, वैभव तातवाडी, संस्कृती बालगुडे, नरेश बिडकर.

कथानक

इंटरनेटच्या या विश्वात सायबर क्राईम हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत असलेला गुन्हा आहे. खासकरून उच्चशिक्षित तरूण या गुन्ह्यांकडे वळताना दिसतात. अनेक महत्वाच्या साईट्स हॅक करणे, बँक्सच्या साईट्स हॅक करणे, ती माहिती चुकीच्या कामासाठी वापरणे किंवा देशद्रोही लोकांना विकणे अशा प्रकारची काही उदाहरणे या सायबर क्राईमबद्दल सांगता येतील. या हायटेक गुन्ह्यांमधून कमीत कमी वेळात अपेक्षेपेक्षा जास्त पैसा मिळत असल्याने तरूण याकडे अधिक आकर्षित होतात. काही मुलं तर गंमत म्हणून याकडे बघतात आणि नंतर त्यात अडकले जातात. हे तरूण जेव्हा या गुन्ह्यांच्या मार्गावर येतात तेव्हा त्यांना याचा शेवट माहिती नसतो. कधी ना कधी ते त्यात अडकतात. तर कधी इतके गुरफटले जातात की, त्यातून त्यांना परत येणं जवळपास कठिण होऊन बसतं. अशाच एका तरूणाचा थरारक सायबर क्राईम प्रवास रंजकपणे 'शॉर्टकट' सिनेमात दाखवण्यात आला आहे. सोबतच यात सिझलींग रोमान्सही बघायला मिळणार आहे. 

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक