LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
3:56 किल्लारी

3:56 किल्लारी

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट

प्रस्तावना

काही वर्षापूर्वी मराठवाडय़ातील ‘किल्लारी’ भागात झालेल्या भीषण भूकंपाने लाखो घरे उद्ध्वस्त झाली आणि हजारो जणांचे बळी गेले. त्या भयाण वास्तवतेचे भीषण पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत. भूकंपानंतर भोगाव्या लागणाऱया या भीषण मानसिक पडसादाचे चित्रण ‘3:56 किल्लारी’ या नव्या चित्रपटात करण्यात आले. किल्लारीमधील भूकंपावर आधारित ‘3:56 किल्लारी’ हा चित्रपट येत्या 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

डीजीएस एन्टरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा-पटकथा दीपक भागवत यांनीच लिहिली असून विजय मिश्रा यांनी छायांकन केले आहे. तसेच विजय मिश्रा यांनी दिग्दर्शनातही सहाय्य केले आहे. कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांनी केले असून संकलन जयंत जठार यांचे तर वेशभूषा चैत्राली डोंगरे यांनी केली. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १२५ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बालकलाकार गौरी इंगवले हिची मध्यवर्ती भूमिका असून सई ताम्हणकर बरोबरच बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ तसेच ज्येष्ठ मराठी अभिनेते श्रीकांत मोघे, अनुराग शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सईची भूमिका एका शिक्षिकेची असून ती केवळ शिक्षिका नाही तर एक उत्तम मार्गदर्शिका आहे. ही भूमिका तशी नॉन ग्लॅमरस असली तरी फार वेगळी आहे.

भूकंपानंतर एका मुलीच्या मानसिकतेत कसा बदल होत गेला त्याचेच चित्रण या चित्रपटात पहावयास मिळणार आहे. या चित्रपटाला महेश-चिनार यांनी संगीत दिले असून चंद्रशेखर सानेकर यांनी लिहिलेली गीते गायक हरिहरन आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायली आहेत.

 • प्रस्तुती तिथी: 21 August 2015
 • प्रस्तुती तिथी:
 • निर्माता: गिरीश साठे ( अरभाट फिल्म्स, खरपूस फिल्मस )
 • दिग्दर्शक: दीपक भागवत आणि विजय मिश्रा.
 • लेखक: दीपक भागवत.
 • पटकथा: दीपक भागवत.
 • गीतकार: चंद्रशेखर सानेकर.
 • गायक/गायिका: डॉ नेहा राजपाल, हरिहरन, हृषीकेश कामेरकर आणि महलक्ष्मि अय्यर .
 • संगीत: चिनार-महेश.
 • भुमिका आणि पात्र:

  जैकी श्राफ, साई ताम्हणकर, अनुराग शर्मा, पंकज विष्णू, श्रीकांत मोघे, रमा जोशी आणि बाल कलाकार गौरी इंगवले.  

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

 • कारखानीसांची वारी

  कारखानीसांची वारी

 • बळी

  बळी