LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
कॅरी ऑन मराठा

कॅरी ऑन मराठा

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट

प्रस्तावना

अरुण नलावडे हे नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहत ते साध सुध व्यक्तिमत्व. त्यांनी भूमिकाही आपल्या व्यक्तिमत्वाला साजेशा अशाच केल्या. 'श्वास' चित्रपटात त्यांनी नातवासाठी तळमळणाऱ्या आजोबांची भूमिका केली तर त्यांच्या गंमत जंमत नाटकाने धमाल उडवली होती. आपल्या अभिनयाने त्यांनी अगदी साध्या भूमिकाही जिवंत केल्या.  कॅरी ऑन मराठामध्ये अरुण नलावडे यांनी ग्रे शेड असलेली भूमिका साकारली आहे.

पहिल्यांदा अशा वेगळ्या भूमिकेत आणि लूकमध्ये पाहायला मिळणार आहेत. सिनेमातला त्यांचा लूक त्यांच्या भूमिकेला साजेसा असा आहे. त्यांचे चाहते त्यांच्या या भूमिकेवरही प्रेम करतील यात शंकाच नाही.

  • प्रस्तुती तिथी: 24 July 2015
  • निर्माता: नंदा चंद्रभान ठाकूर, शशिकला क्षीरसागर (नंदा आर्ट्स आणि वारीअर ब्रदर्स मोशन पिक्चर्स).
  • दिग्दर्शक: संजय लोंढे.
  • कथा: संजय लोंढे.
  • गीतकार: गुरु ठाकूर, मंगेश कंकणे, अश्विनी शेंडे आणि हृदयेश शिवा .
  • गायक/गायिका: श्रेय घोशाल, वैशाली माडे, शैल हांडा, उर्मिला धनगर.
  • संगीत: शैल आणि प्रीतेश
  • भुमिका आणि पात्र:

    अरुण नलावडे, अमीन हाजी, करीम हाजी, किशोरी बल्लाळ, उषा नाईक, ओंकार कुळकर्णी, शंतनू मोघे, समीर खाडेकर, देविका दफ्तरदार, अमेय कुंभार आणि सचिन देशपांडे. 

कथानक

निस्वार्थ निखळ प्रेमकथा नेहमीच सिनेमाची जान राहिल्या आहेत. अशीच एक अनोखी प्रेम कहाणी ‘कॅरी ऑन मराठा’च्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर ही प्रेमकथा रंगताना दिसेल. २४ जुलै २०१५ ला  प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाला मनोरंजनाची झकास फोडणी दिली आहे. जी प्रत्येक घरासाठी आणि घरातील प्रत्येकासाठी आहे.

या निमित्ताने ग्श्मीर महाजनी हा देखणा, दमदार, तरुणींच्या दिलाची धडकन चुकवणारा हँडसम हिरो मराठी सिनेसृष्ठीत पदार्पण करत आहेत. अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी ही कुसुम नावाच्या एका कानडी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. मार्तंड आणि कुसुम यांच्यात फुलणारी प्रेमकहाणी सिनेमाचा गाभा आहे.

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

  • कारखानीसांची वारी

    कारखानीसांची वारी

  • बळी

    बळी