LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
दगडी चाळ

दगडी चाळ

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट, १९९६ ची मुंबई …मुंबईतील तेव्हाची परिस्थिती आज रुपेरी पडद्यावर

प्रस्तावना

१९९६ ची मुंबई …मुंबईतील तेव्हाची परिस्थिती आज रुपेरी पडद्यावर पाहणं मनोरंजनाचा एक भाग झालीयं. पण त्याकाळी प्रत्यक्ष अनुभवनाऱ्यांच्या मनात एक विदारक घर करून बसली आहे. त्यात आजही वारंवार चर्चेत येणाऱ्या नावांपैकीच एक नाव म्हणजे दगडी चाळ अर्थात डॅडी .

त्याकाळात मुंबईवर आपली सत्ता प्रस्थापित करू पाहणाऱ्या काही नावांमधल एक नाव म्हणजे डॅडी आणि त्यांचं सुरक्षा कवच असलेली दगडी चाळ सर्वश्रुत आहे, कारण गॅंग्ज आणि गॅंगवॉर्सच्या सर्कल मध्ये अडकलेली आमची मुंबई. अर्थात हा वाम मार्ग तेव्हा काही सगळ्यांनी च स्वेछेने निवडला नव्हता. अशाच प्रतिकूल परिस्थितीत अपघाताने या प्रवाहात अडकलेल्या एका सामान्य तरुणाच्या आयुष्यावर चित्रित झालेला दगडी चाळ हा रंजक मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

मध्यप्रदेशातील खांडवा गावावरून आल्यानंतर अरुण गवळी आणि त्याचे कुटुंबीय दगडी चाळीत राहायला आले. अनेक गिरणी कामगारांचे वास्तव्य याच दगडी चाळीत होते. भायखळा येथे ही दगडी चाळ आहे. दिसायला साधी असलेली ही चाळ बाहेरच्या जगासाठी खूपच विशेष होती. अनेक बेरोजगार तरुण, आपल्या मद्यपी नवऱयाला कंटाळलेल्या बायका न्यायासाठी दगडी चाळीमध्ये येत असत. अरुण गवळीला भेटून आपले गाऱहाणे ते मांडत असत. याच दगडी चाळीचे हे वैशिष्टय़ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तीन मजली ही दगडी चाळ असून एक मोठे लोखंडी प्रवेशद्वार या दगडी चाळीला आहे. दगडी चाळीला एक गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. हीच पार्श्वभूमी या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये अरुण गवळीपेक्षा चाळीमध्ये राहणाऱया लोकांची मानसिकता दाखविण्यात आली आहे.

मराठी सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत दगडी चाळ अशा व्यक्तिरेखांवर आधारलेला हा पहिला वाहिला मराठी सिनेमा प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्कंठावर्धक असेल यात शंकाच नाही. या चित्रपटाच केंद्रबिंदू गॅंगवॉर नसून त्यातील हळुवार फुलत जाणारी प्रेमकथा आहे. त्यामुळे यंगस्टर्ससाठी एक पर्वणीच असेल. मंगलमूर्ती फिल्म्स आणि साई पूजा फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनीही या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण केलंय. हा सिनेमा २ ऑंक्टोबर २०१५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. एकूणच मराठीतील हा पहिला वाहिला स्टाईलिश दगडी चाळ प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल.

--प्रणाली साळुंके

 • प्रस्तुती तिथी: 02 October 2015
 • निर्माता: संगीता अहिर, सुरेश सावंत, अमोल काळे (मंगलमूर्ती फिल्म्स आणि साई पूजा फिल्म्स)
 • दिग्दर्शक: चंद्रकांत कणसे
 • कथा: अजय ताम्हणे आणि प्रवीण कामले.
 • पटकथा: आदेश के. अर्जुन
 • संगीत: अमितराज
 • भुमिका आणि पात्र:

  मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी, पूजा सावंत, कमलेश सावंत.  

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

 • कारखानीसांची वारी

  कारखानीसांची वारी

 • बळी

  बळी