LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
देऊळ बंद

देऊळ बंद

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे

प्रस्तावना

स्वामी समर्थाचे कार्य आणि आजही स्वामी समर्थ सेवामार्ग केंद्रांच्या वतीने होत असलेल्या कार्याची माहिती पुढे यावी यासाठी 'देऊळ बंद' हा चित्रपट तयार करण्यात येत असून गुरूपौर्णिमेला तो सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रीकरणात निवेदिता जोशी-सराफ, श्वेता शिंदे, गिरीजा जोशी, प्रविण तरडे, गंमीर महाजनी, विभावरी देशपांडे, कालकलाकार आर्या आदीं आहेत.

  • प्रस्तुती तिथी: 31 July 2015
  • निर्माता: जयश्री कैलाश वाणी, ज्युली कैलाश वाणी.
  • दिग्दर्शक: प्रवीण विठ्ठल तरडे आणि प्रणीत कुळकर्णी
  • कथा: प्रवीण विठ्ठल तरडे
  • पटकथा: प्रवीण विठ्ठल तरडे आणि प्रणीत कुळकर्णी
  • गीतकार: प्रणीत कुळकर्णी
  • संगीत: नरेंद्र भिडे, रोहित नागभिडे.
  • भुमिका आणि पात्र:

    गिरीजा जोशी, मोहन आगाशे, निवेदिता सराफ, प्रवीण तरडे, सतीश आळेकर, किरण यद्नोपवीत, दीपक करंजीकर, शर्वरी जेमिनी, सुनील अभ्यंकर, श्वेता शिंदे, स्नेहल तरडे, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, आणि आर्या घरे.

कथानक

कधी सामान्य माणूस तर कधी खलनायक, कधी धूर्त राजकारणी तर कधी प्रेमळ पिता अशा विविधांगी भूमिकांना न्याय देणारे अभिनेते मोहन जोशी एका नव्या रूपात समोर येणार आहेत. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यावर आधारित असलेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटात मोहन जोशी स्वामींची भूमिका साकारत आहेत.

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ हा मंत्र संपूर्ण जगाला देणारे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आता रूपेरी पडद्यावर अवतरणार आहेत. ‘देऊळ बंद’ या आगामी सिनेमात स्वामी भक्तांना समर्थांचं दर्शन घडणार आहे. आजवर चित्रपट आणि मालिकांचं लेखन करणारे प्रवीण तरडे ‘देऊळ बंद’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाकडे वळले आहेत. प्रणीत कुलकर्णींसोबत ते या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. याच चित्रपटात मोहन जोशी स्वामींचं पात्र साकारत आहेत.

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

  • कारखानीसांची वारी

    कारखानीसांची वारी

  • बळी

    बळी