LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
धिनच्याक इंटरप्राईज

धिनच्याक इंटरप्राईज

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट, नव्या धाटणीची लव्ह स्टोरी...

प्रस्तावना

प्रेमा तुझा रंग कसा? याचं उत्तर कोणाला ठाऊक असेल माहित नाही पण त्याची प्रचीती स्वतःहून घेण्यासाठी सगळेच उत्सूक असतात. त्यामुळे आयुष्यात एकदातरी प्रेम करून पहायला हरकत नाही असो,  आजकाल सगळ्याचं नात्याची समीकरणं बदलत चालल्याने नेमकं विश्वासाचं आणि हक्काचं नातं कोणतं याचा थांगपत्ता कित्येकांना शेवट पर्यंत लागत नाही. मात्र या सगळ्यांत माणुसकीचे असे एक नाते आहे जे वैश्विक मानले जाते. मात्र त्याचे परीस्थितीनुरूप पालटणारे  स्वरूप नेमके कसे आहे यावर भाष्य करणारा ढिनच्यॅक एंटरप्राइज हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २१ ऑगष्ट रोजी सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमात मनवा नाईक आणि भूषण प्रधान यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. अंधेरीतील दी क्लब या हॉटेलमध्ये नुकताच सिनेमाचा फर्स्ट लूक आणि म्युझिक लॉंच करण्यात आले. सिनेमात मीरा आणि विशाल यांच्या जोडीप्रमाणे सिनेमाची कथा देखील तितकिच संवेदनशील आणि सत्य परिस्थितीचा आढावा घेणारी आहे. सर्व साधारण स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी किंवा प्रोडक्ट विकण्यासाठी वापरलं जाणारं मार्केटिंग समाजाच्या आणि माणसाच्या भल्यासाठी देखील वापरता येऊ शकतं यावर एकूणचं सिनेमाची कथा बेतली आहे. निशांत सपकाळे यांनी सिनेमाच दिग्दर्शन केल असून चार्मी गाला हे निर्माते आहेत. उदयसिंग मोहिते यांनी छायाचित्रिकरणाची धुरा सांभाळली असून देवेंद्र मुरुडेश्वर यांनी सिनेमाचे संकलन केले आहे. समीर साप्तीक आणि काशी रिचर्ड यांनी मिळून सिनेमाला संगीत दिल आहे.  सचिन पाठक आणि मयुर सपकाळे यांनी सिनेमाची गीते लिहिली आहेत तर हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या गायकांचा सिनेमातील गीतांना स्वरसाज चढला आहे. हिंदीतील प्रख्यात गायक मिकासिंग, हर्षदीप कौर, पापोन आणि शिंदे शाही गाजवणारा आदर्श शिंदे यांनी गाणी गायली आहेत. ढिनच्यॅक या टायटल सॉंगने या म्युझिक लाँच सोहळ्याची रंगत वाढवली. 'हे नाते', 'रे मना' या रोमांटीक गाण्याने सोहळ्याची संध्याकाळ अधिक खुलली. सुप्रसिद्ध गायक मिकासिंग यांच्या आवाजाची नशा सगळ्यांनीच मनसोक्त अनुभवली.

 • प्रस्तुती तिथी: 21 August 2015
 • निर्माता: चर्मी दिनेश गाला ( बॉक्स ऑफिस, लव प्रोडक्शन )
 • दिग्दर्शक: निशांत देविदास सपकाळे.
 • लेखक: निशांत देविदास सपकाळे.
 • पटकथा: निशांत देविदास सपकाळे.
 • गीतकार: सचिन पाठक (Yo), मयूर सपकाळे.
 • गायक/गायिका: मिल्का सिंग, हर्षदीप कुर, पापोन आणि आदर्श शिंदे.
 • संगीत: समीर सप्तीष्कार, कशी रिचर्ड.
 • भुमिका: भूषण प्रधान, मानावा नाईक.

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

 • कारखानीसांची वारी

  कारखानीसांची वारी

 • बळी

  बळी