LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
हायवे

हायवे

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट, हायवे एक selfie आरपार

प्रस्तावना

मुंबईची ‘धाव’ आणि पुण्याची ‘चाल’ यांना जोडणारा मार्ग म्हणजे मुंबई-पुणे एक्सप्रेस ‘हायवे'. मुंबई-पुण्याहून वेगवेगळ्या वाहनातून वेगवेगळी माणसे निघतात आणि हायवेवरील वाहने पळू लागतात... या एवढ्याशा ‘वनलाईन'ला घेऊन लेखक-दिग्दर्शक जोडगोळी गिरीश-उमेश कुलकर्णी यांनी एक विचार करायला लावणारी, तरीही मनोरंजन करणारी चित्रकथा रंगवली आहे.

उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी आणि विनय गानू यांच्या "आरभाट कलाकृती" आणि "खरपूस फिल्म्स"चा ‘हायवे’ हा नवा मराठी सिनेमा येत्या 24 जुलैला महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

  • प्रस्तुती तिथी: 28 August 2015
  • प्रस्तुती तिथी: चित्रपट मात्र काही तांत्रिक अडचणी मुळे प्रकाशनात पुढे ढकलला गेला आहे, 24 जुलैला प्रदर्शित अपेक्षित होते. प्रकाशन तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही तरी कदाचित चित्रपट पुढील महिन्यात प्रकाशीत केला जाईल.
  • निर्माता: विनय वामन गणू ("आरभाट कलाकृती" आणि "खरपूस फिल्म्स)
  • दिग्दर्शक: उमेश विनायक कुळकर्णी
  • लेखक: गिरीश कुळकर्णी
  • पटकथा: गिरीश कुळकर्णी
  • गीतकार: वैभव जोशी
  • संगीत: अमित त्रिवेदी
  • भुमिका आणि पात्र:

    सतीश आळेकर, उमेश जगताप, शुभम, शकुंतला नगरकर, पूर्णानंद वांदेकर, निपुण धर्माधिकारी, देवेंद्र गायकवाड, सविता प्रभुणे, छाया कदम, नागराज मंजुळे, नंदकिशोर चौघुले, गिरीश कुळकर्णी , हुमा कुरैशी, टिस्का चोप्रा, रेणुका शहाणे राणा, विद्याधर जोशी, मुक्ता बर्वे, सुनील बर्वे, मयूर खांडगे, श्रीकांत यादव, किशोर चौगुले, किशोर कदम, वृषाली कुळकर्णी, पूर्वा पवार.

कथानक

माणूस प्रवासाने घडतो आणि माणूस प्रवासातच कळतो. मग तो प्रवास जीवनाचा असो किंवा ‘हायवे'वरचा. या कल्पनेभोवती गिरीश-उमेश कुलकर्णी यांनी कथा रंगवली आहे. वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक स्तरामधली माणसं आपापल्या भावभावना, प्रश्नाच्या वेदना आदींच्या बॅग घेऊन प्रवासाला निघतात आणि मग...? हा त्यांच्या प्रवासातील ‘पॉझ’त्या प्रत्येक प्रवाशाचा ‘चेहरा’उघड करतो.

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

  • कारखानीसांची वारी

    कारखानीसांची वारी

  • बळी

    बळी