LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
कट्यार काळजात घुसली

कट्यार काळजात घुसली

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट

प्रस्तावना

गेली पन्नास वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे संगीत नाटक ‘कट्यार काळजात घुसली’ हे मराठी रंगभूमीवरचं सोनेरी पान. आता याच सोनेरी पानाला चित्रपटाव्दारे रुपेरी पडदयावर साकारल जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता सुबोध भावे करणार आहे. पुरषोत्तम दारव्हेकर यांच्या लिखाणातून सजलेल्या या नाटकाला पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वर्गीय संगीताने सुरेल स्वरसाज चढवला असून पं वसंतराव देशपांडे यांच्या सहजसुंदर अभिनयाने नटलेलं हे नाटक आजही रसिकांच्या ह्रद्यात अढळस्थानी आहे. पं.वसंतराव देशपांडे यांच्यानंतर त्यांचा नातू राहुल देशपांडे यांनी हे नाटक नव्याने रंगभूमीवर आणलं. या नव्या संचातल्या नाटकालाही प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. संगीताची परंपरा जपणा-या दोन घराण्यांमधील संघर्षांवर आधारित हे नाटक आता चित्रपटाव्दारे रुपेरी पडद्यावर साकारले जात आहे. ‘एस्सेल व्हिजन’ आणि ‘श्रीगणेश मार्केटिंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.

पं. जितेंद्र अभिषेकींचे संगीत या चित्रपटाचा मुख्य प्राण असून नाटकात असलेली सगळीच गाणी या चित्रपटामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. आजही रसिकांच्या ओठांवर असणारी ही गाणी पं. शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, महेश काळे, सावनी शेंडे यांच्या सुरेल आवाजतून स्वरबध्द करण्यात येणार आहेत.

 • प्रस्तुती तिथी: 13 November 2015
 • निर्माता: एस्सेल विजन आणि गणेश फिल्म्स
 • दिग्दर्शक: सुबोध भावे.
 • कथा: पुरुषोत्तम दारव्हेकर आणि प्रकाश कपाडिया
 • पटकथा: प्रकाश कपाडिया
 • गायक/गायिका: पं. शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, महेश काळे, सावनी शेंडे
 • भुमिका आणि पात्र:

  सचिन पिळगावकर,सुबोध भावे, अमृता खानविलकर, साक्षी तन्वर, मृण्मयी देशपांडे आणि प्रसिद्ध गायक शंकर महादेवन.

कथानक

ही कथा आहे पंडित भानुशंकर आणि खाँसाहेब आफताब हुसेन ह्यांच्या दोन संगीत घराण्यांतल्या संघर्षाची! पंडित भानुशंकरजी हे एका संस्थानातले राजगायक. ह्या संस्थानात पंडितजींनी दहा वर्षं 'राजगायक' हे पद भूषवलं आहे आणि आपल्या गायकीची छाप तिथल्या रसिकांवर टाकली आहे. लोकांना त्यांचं गाणं, ते पेश करण्याची पद्धत नुसती आवडतच नाही, तर अंगवळणी पडली आहे. गाणं असेल, तर पंडितजी गातात तसंच, इतका ठसा पंडितजींनी तिथे उमटवला आहे.

खाँसाहेब आफताब हुसेन ह्या दुसर्‍या घराण्याच्या गायकाला मात्र पंडितजींचं हे यश खुपतंय. त्यांनी सलग दहा वर्षं पंडितजींकडून ’राजगायक’ हा खिताब मिळवण्यासाठी संघर्ष केलाय. ते पद आपलं व्हावं, पंडितजी त्या पदावरून पायउतार व्हावेत ह्यासाठी त्यांनी अमाप कष्ट घेतले आहेत, बारा-बारा तास रियाझ केला आहे. तरीही पंडितजींना हरवण्यात अजून त्यांना यश आलेलं नाही! सतत दहा वर्षं त्यांच्याकडून हरल्यानंतर मात्र अकराव्या वर्षी एक नवल घडतं! त्या वर्षी खाँसाहेबांच्या गायनानंतर पंडितजी गायलाच बसत नाहीत.. त्यांच्या तानपुर्‍यामधून सुरावट झंकारत नाही, तर डोळ्यांमधून केवळ आसवं ओघळतात! एक ओळही न गाता ते मैफल अर्धवट सोडून अज्ञातवासात निघून जातात. ते असे अर्धवट मैफल सोडून निघून गेल्यामुळे खाँसाहेबांचं स्वप्न पूर्ण होतं! ’राजगायक’ हा खिताब त्यांचा होतो! इतकंच नाही, तर ती हवेली, ज्यात पंडितजींचं वास्तव्य होतं, तो मानमरातब, ते राजगायकाचं मानधन सगळं सगळं त्यांचं होतं!

खाँसाहेबांना पंडितजींचा जनमानसावर असलेला ठसा संपूर्णपणे मिटवून टाकायचा आहे. त्यांना पंडितजींच्या गायकीची शैली बिलकुल आवडत नाही. पंडितजींची शैली मृदू, आर्जवी, थोडी भक्तिरसपूर्ण अशी आहे. खाँसाहेबांची शैली मात्र पूर्ण भिन्न आहे. त्यांच्या मते गाणं म्हणजे सळसळत्या नागिणीसारखं हवं. आक्रमक, हरकती-मुरकतींनी युक्त, रसिकांना लयीवर, तालावर डोलायला लावणारं! एक आव्हान म्हणून ते पंडितजींचं अत्यंत सुप्रसिद्ध भजन आपल्या, संपूर्णपणे वेगळ्या आणि आवेशयुक्त चालीत बांधतात. त्या भजनावरचा पंडितजींचा अंमल नाहीसा केल्यानंतर कुठे त्यांना बरं वाटतं..... शेष बघा चित्रपटातच-

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

 • कारखानीसांची वारी

  कारखानीसांची वारी

 • बळी

  बळी