LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
नटसम्राट : नाना पाटेकर

नटसम्राट : नाना पाटेकर

आगामी चित्रपट, मराठी चित्रपट, 'नटसम्राट' अवतरणार रुपेरी पडद्यावर

  • निर्माता: फिनक्राफ्ट मिडिया अॅण्ड एंटरटेनमेंट प्रा. लि., गजानन चित्र आणि आणि ग्रेट मराठा एंटरटेनमेंट
  • दिग्दर्शक: महेश मांजरेकर
  • भुमिका: नाना पाटेकर, महेश मांजरेकर, विक्रम गोखले, रीमा, सुनील बर्वे, नेहा पेंडसे

कथानक

मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने वि.वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले नटसम्राट या अजरामर नाटकाचा सिनेमा येतोय. मराठी रंगभूमीवर आपल्या कथा- आशयाने अजरामर ठरलेले ‘नटसम्राट’ हे नाटक आता मराठी चित्रपटाच्या रूपातही आपल्यासमोर येणार आहे. या फाईमक्राफ्ट मीडिया आणि द ग्रेट मराठा प्रा.लि. ह्याची निर्मिती असलेल्या या सिनेमाचा मुहूर्त दि.२७ फेबृवारीला नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये पार पडला. नटसम्राट सिनेमात अभिनेते नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका आहे.

जबरदस्त संहिता, मर्मभेदी संवाद आणि अभिनयाची जुगलबंदी असलेल्या 'नटसम्राट'ने मराठी नाट्यसृष्टीत एक अनोखी उंची गाठली आहे. डॉ श्रीराम लागू, दत्ता भट, यशवंत दत्त, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी अशा अनेक प्रतिभावंतांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर गणपतराव बेलवलकरांची भूमिका जगलीये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 'नटसम्राट' चित्रपटामुळे पुन्हा एकदा नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकरांच्या अभिनयाची जादू अनुभवता येणार आहे. अष्टपैलू कलावंत नाना पाटेकरांच्या अभिनयाद्वारे ७०च्या दशकातील गणपतराव बेलवलकर हे पात्रं पुनरुज्जीवीत होणार आहे. 

नाना पाटेकरांची प्रथम निर्मिती असलेल्या 'नटसम्राट' विषयी बोलताना आपल्या जुन्या ऋणानुबंधांच्या आठवणी सांगितल्या. "१९७० मध्ये 'नटसम्राट' नाटक रंगमंचावर आलं तेव्हा मी जेमतेम २० वर्षांचा होतो पण त्याचवेळी हे नाटक एक मापदंड म्हणून मान्यता पावलेलं होतं. त्यावेळी डॉ श्रीराम लागू, दत्ता भट यांनी साकारलेल्या भूमिका काळजात रुतून बसल्या होत्या. नटसम्राट करायला मिळेल असं माझ्यातल्या नटाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. आत्ता आप्पासाहेब बेलवलकर यांची अजरामर भूमिका खुणावत असतानाच महेश मांजरेकरांनी ही संधी मला दिली. माझ्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट आहे." असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. 

नाना बरोबर विक्रम गोखले, रीमा, नेहा पेंडसे, सुनील बर्वे यांसारखे दिग्गज पहिल्यांदाच नटसम्राटच्या निमित्ताने एकत्रित येत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. 'नटसम्राट'ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि ग्रेट मराठा एंटरटेनमेंटचे अनिरुद्ध देशपांडे यांची मोलाची मदत लाभली आहे. To Be or Not To Be’, ‘जगावं की मरावं’, ‘कुणी घर देतं का घर…?’ असे काळजाला हात घालणारे संवाद, टाळ्यांचा गजर, साश्रू नयनांनी ‘नटसम्राट’ला रसिकांनी दिलेली मानवंदना लवकरच रुपेरी पडद्यावर अनुभवता येणार आहे. 'नटसम्राट'च्या चित्रीकरणाला ४ मार्चपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.  

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

  • कारखानीसांची वारी

    कारखानीसांची वारी

  • बळी

    बळी